Suzuki Scooter : सुझुकी कंपनीचे मार्केटमध्ये पहिल्यापासूनच वर्चस्व आहे. या कंपनीच्या बाईक आणि स्कूटरला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. तसेच बदलत्या काळानुसार कंपनीने बाईक्स आणि स्कूटरमध्ये देखील बदल केले आहेत.
आता कंपनीकडून बाईक्स आणि स्कूटरचे अनेक नवनवीन मॉडेल सादर केले जात आहेत. तसेच या नवीन मॉडेल्सला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. जर तुम्ही सुझुकी कंपनीची स्कूटर खरेदी करण्याचा प्लॅन करत आहेत आणि बजेट कमी पडत आहे तर काळजी करू नका.
आज तुम्हाला सुझुकी कंपनीच्या Access 125 स्कूटर बद्दल सांगणार आहोत. ही स्कूटर तुम्ही फक्त 5418 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्यामुळे बजेट कमी असले तरीही तुम्ही ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता.
5418 रुपये डाउनपेमेंट भरून तुम्ही Access 125 ही स्कूटर खरेदी करू शकता. या स्कूटरवर EMI पर्याय उपलब्ध आहे. बँकेकडून तुम्हाला ही स्कूटर खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते. ज्याचे तुम्हाला दरमहा हफ्ते भरावे लागतील.
मायलेज
कंपनीचा दावा आहे की Access 125 ही स्कूटर 49.5 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरची इंधन टाकीची क्षमता 5.5 लीटर आहे. एकदा टाकी फुल केल्यानंतर ही स्कूटर 272 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या स्कूटरचे टॉप स्पीड ताशी 95 किमी देण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
स्कूटरची रचना अधिक चांगल्या फीचर्ससह करण्यात आली आहे. यामध्ये 13 कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत. स्मार्ट वैशिष्ट्यांमध्ये डिजिटल ओडोमीटर, यूएसबी चार्जिंग पॉइंट, स्पीडोमीटर, डिजिटल इंधन गीझर ही सर्व वैशिष्ट्ये स्कूटरमध्ये देण्यात आली आहेत.
या स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. दोन्ही चाकामध्ये रंगीत पेंट वापरण्यात आला आहे. हे 124 cc इंजिनद्वारे समर्थित आहे जे 8.58 BHP ची कमाल शक्ती निर्माण करते.
EMI योजना
बाजारात या स्कूटरची किंमत 108351 रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करत असाल तर आणखी काही पैसे या स्कूटर खरेदी साठी मोजावे लागतील. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये देखील ही स्कूटर खरेदी करू शकता.
5418 चे डाउन पेमेंट भरून तुम्ही ही स्कूटर खरेदी करू शकता. बाकीचे पैसे तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात दिले जातील. तसेच हे पैसे तुम्हाला हफ्त्याच्या स्वरूपात भरावे लागतील. ज्यावर तुम्हाला वार्षिक व्याज 9.5% टक्क्यांनी व्याजदर भरावे लागेल. 36 महिन्यांसाठी 3674 रुपयांचा हफ्ता भरावा लागेल.