Swift Dzire Car : मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय कार स्विफ्ट डिझायर खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र किंमत जास्त असल्याने अनेकांच्या बजेटबाहेर ही कार जात असते. मात्र आता तुम्हीही फक्त १ लाखात स्विफ्ट डिझायर कार खरेदी करू शकता.
भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता स्विफ्ट डिझायर २०२३ चे नवीन मॉडेल लॉन्च होणार आहे. मात्र हे २०२३ चे नवीन मॉडेल लॉन्च होण्यापूर्वीच या कारच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे.
देशातील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या कारची LXi, VXi, ZXi आणि ZXi+ ट्रिम हे अनेक मॉडेल सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
तसेच डिझायर कारचे दोन सीएनजी प्रकार आहेत. डिझायर कारची एक्स शोरूम किंमत 6.44 लाख रुपयांपासून पासून सुरू होते. या कारची किंमत कमी असल्याने अनेकांना खरेदी करणे शक्य होत आहे.
जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हालाही स्विफ्ट डिझायर कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउनपेमेंट करून तुम्ही EMI वर ही कार खरेदी करू शकता.
मारुती डिझायर VXI CNG डाउनपेमेंट आणि EMI
तुम्हाला मारुती डिझायर VXI CNG कार खरेदी करायची असेल तर तुम्ही देखील EMI वर खरेदी करू शकता. या कारची एक्स शोरूम किंमत 8.39 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करताना तुम्हाला ऑन रॉड किंमत 9.44 लाख रुपये भरावे लागतील.
तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला सुमारे 8.44 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांचा कालावधी मिळेल. तसेच या कर्जावर तुमच्याकडून 9% व्याजदर आकारले जाईल आणि दरमहा 17,536 रुपयांचा हफ्ता भरावा लागेल.
मारुती डिझायर ZXI CNG डाउनपेमेंट आणि EMI
मारुती डिझायर ZXI CNG वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 9.07 लाख रुपये आहे. या कारची ऑन रॉड किंमत 10.17 लाख रुपये जाते. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउनपेमेंट केल्यास तुम्हाला 9.17 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
हे कर्ज तुम्हाला ५ वर्षासाठी दिले जाईल. हे कर्ज तुम्हाला 9 टक्के व्याजदराने दिले जाईल. पुढील पाच वर्षासाठी तुम्हाला दरमहा 19,050 रुपये EMI भरावे लागेल. या कर्जावर तुम्हाला 2.25 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.