Taliban : सध्या भारत आणि तालिबान या दोन देशामध्ये ‘Immersing With Indian Thoughts’ या ऑनलाइन अभ्यासक्रमावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आयआयएम कोळीकोड या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालिबानमधील राजदूत आणि राजनयिक कर्मचारी या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संस्थेमार्फत तालिबानमधील राजकीय लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी एक विशेष ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केला आहे.
ज्यामध्ये तालिबानचे काही सदस्यही सहभागी होत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये याबाबतच्या एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जगभरातील एक दोन देश वगळता कोणत्याही देशाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही.
जागतिक स्तरावरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा अभ्यासक्रम करार केला जात आहे. या कराराअंतर्गत तालिबानमधील राजकीय नेते तसेच उच्चपदस्थ अधिकारी प्रशिक्षण घेणार आहे, असे सांगितले जात आहे.
या कराराअंतर्गत तालिबानमधील राजकीय नेते तसेच उच्चपदस्थ अधिकारी प्रशिक्षण घेणार आहे. सर्वांना काबूल येथील अफगान इंस्टिट्यूट ऑफ डिप्लोमेसी येथे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कोळीकोड या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.