भारत

Tata Tiago EV : टाटा कंपनीने Tiago EV कारच्या किमतीत केली वाढ, पहा लक्झरी फीचर्स असणाऱ्या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये…

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक क्षेत्रातील सर्वात स्वस्त आणि लक्झरी फीचर्स असणारी Tata Tiago EV कार लॉन्च केली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक आहेत मात्र टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल केली आहे.

टाटा मोटर्सच्या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सच्या कारमध्ये अधिक सुरक्षा आणि किंमत कमी असल्याने अनेकजण या कंपनीच्या कारकडे आकर्षित होत आहेत. टाटा मोटर्सकडून दरवर्षी नवीन वाहने लॉन्च केली जात आहेत.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकांना इंधनावरील कार वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर अधिक भर देत आहेत.

टाटा मोटर्स देखील इलेक्ट्रिक कार उत्पादित करण्याकडे अधिक लक्ष देत आहे. वाढत्या इंधनाच्या किमती पाहता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. टाटा मोटर्सकडून Tata Nexon EV आणि Tata Tigor EV इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत.

Tata Tiago EV बॅटरी

कंपनीकडून या इलेक्ट्रिक कारला दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. जी 19.2kWh पॅक आणि 24kWh बॅटरी पॅक आहे. लहान बॅटरी पॅक 61hp आणि 110Nm इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला आहे, तर मोठ्या बॅटरी पॅकमध्ये 74hp आणि 114Nm इलेक्ट्रिक मोटर मिळते जी अनुक्रमे 250km आणि 315km ची MIDC-प्रमाणित रेंज देतात.

वैशिष्ट्ये

Tata Tiago EV कारमध्ये ७-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, क्रूझ कंट्रोल, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलाइट्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि 8-स्पीकर हार्मन म्युझिक सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. .

किंमत

टाटा मोटर्सकडून सर्वात प्रथम सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago लॉन्च करण्यात अली आहे. लॉन्च वेळी असणाऱ्या किमतीमध्ये आता कंपनीकडून 20,000 रुपयांची वाढ करण्यात अली आहे.

टाटा Tiago इलेक्ट्रिक कारच्या बेस मॉडेलची किंमत 8.69 लाख रुपये झाली आहे. तर टॉप वेरिएंटची किंमत 11.79 लाख रुपयांवरून 11.99 लाख रुपये झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts