Ayodya Dham Railway Station : देशातील सर्वात मोठ्या मंदिराचे काम सध्या अयोध्यामध्ये सुरु आहे. राममंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर म्हणजेच आज अयोध्यामध्ये जाऊन अयोध्या वासियांना अनेक मोठ्या भेटवस्तू देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्या भेट देणार आहेत. अयोध्यामध्ये रेल्वे स्टेशन तयार करण्यात आले आहे. अवघ्या काही अंतरावर हे रेल्वे स्टेशन तयार केले आहे. त्यामुळे भाविक रेल्वे स्टेशनवरून सहज प्रवास करू शकतात. तसेच नरेंद्र मोदी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही उद्घाटन आज करणार आहेत.
2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत गाड्यांना ग्रीन सिग्नल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत रेल्वे गाड्यांना ग्रीन सिग्नल देणार आहेत. जौनपूर-अयोध्या-बाराबंकी येथील रेल्वे ट्रॅक देखील मोठा केला जाणार आहे. अयोध्यामधून अयोध्या ते दरभंगा दरम्यान एक अमृत ट्रेन आणि अयोध्या ते आनंद विहार टर्मिनल दरम्यान एक वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.
अयोध्यामध्ये येणाऱ्या ट्रेन देशातील सर्व ठिकाणी जोडल्या जातील. यामुळे अयोद्यामध्ये येणाऱ्या पर्यटक, यात्रेकरू आणि भाविकांना सहज प्रवासाचा प्रीमियम मिळेल. अयोध्यामध्ये तयार करण्यात आलेले रेल्वे स्टेशन तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
या मार्गांवर धावणार वंदे भारत
श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगलोर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई अशा मार्गावरील वंदे भारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीन सिग्नल देणार आहेत.
अयोध्येचं रेल्वे स्टेशन कसं असेल?
भाविकांना आणि पर्यटकांना अयोध्यातील राममंदिर पाहण्यासाठी सहज आणि सुलभ प्रवास करण्यासाठी अयोध्येत मोठे रेल्वे स्टेशन उभारण्याचे काम सुरु आहे. सध्या या रेल्वे स्टेशनच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. 241 कोटी रुपये खर्चून हे रेल्वे स्टेशन बांधण्यात आले आहे.
या रेल्वे स्टेशनमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना इन्फंट केअर रूम, सिक रूम, पॅसेंजर फॅसिलिटीज डेस्क, टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर अशा सुविधा दिल्या जाणार आहेत ज्या सहसा विमानतळावर देखील दिसत नाहीत.
अयोध्यात तयार करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये क्लोक रूम, फूड प्लाझा, वेटिंग हॉल, जिना, एस्केलेटर, लिफ्ट, टॉयलेट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्टेशनच्या सर्व मजल्यांवर आपत्कालीन सुविधा देण्यात आल्या आहेत.