India News :रशिया व युक्रेनमध्ये युद्ध झाल्यानंतर तिकडे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका झाली खरी मात्र त्यांच्या अडचणी संपायला तयार नाहीत.
या विद्यार्थ्यांना भारतातील वैदयकीय महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल, असे वाटत असताना केंद्र सरकारने मात्र त्यांना असा प्रवेश देता येणार नसल्याचे म्हणने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारचे म्हणने मागविण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने म्हटले आहे की,
हे वैद्यकीय विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी गेले होते. यामागे दोन कारणे आहेत. एक तर त्यांचे नीट परीक्षेतली रँकिंग खराब होते.
दुसरे म्हणजे युक्रेनसारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण खूप स्वस्त आहे. अशा परिस्थितीत खराब गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देणे योग्य होणार नाही.
याशिवाय, हे विद्यार्थी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्कही भरू शकणार नाहीत, असेही सरकारने म्हटले आहे. नॅशनल मेडिकल कमिशन अशा प्रवेशांना परवानगी देत नाही.
अशी सूट दिल्यास देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होईल, असेही आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच अलवंबून आहे.