Driving license : देशात कुठेही वाहन चालवायचे असेल तर नागरिकंना ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवणे कायद्याने गुन्हा मानले जाते. तसेच तुमच्याकडून दंड देखील आकाराला जाईल.
आरटीओ विभागाकडून ड्राइव्हिंग लायसन्स नियमामध्ये तसेच वाहतूक नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. तसेच आताही आरटीओ विभागाकडून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमची कार ऑटोमेटेड टेस्ट ड्राइव्हमध्ये चालवावी लागेल आणि ती पास करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. सरकारने सध्या दिल्लीत हा नियम लागू केला आहे.
दिल्लीमध्ये 13 कूल ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक आहेत आणि आता 12 टेस्ट ड्राइव्ह ट्रॅक ऑटोमेटेड झाले आहेत. दिल्लीमध्ये लायसन्स काढणाऱ्यांना आता थोडी कसरत करावी लागेल.
दिल्लीतील लोकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे थोडे अवघड आहे कारण तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेन्सर्सच्या देखरेखीखाली ऑटोमेटेड ड्रायव्हिंग ट्रॅकवर चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
अनेकवेळा काही लोकांना वाहतुकीचे नियम माहिती नसतात मात्र त्यांच्याकडे लायसन्स असते आणि ते गाडी चालवतात. अशा लोकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यासाठी आता सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी ऑटोमेटेड टेस्ट ड्राइव्ह नियम आणला आहे.