अर्थसंकल्पामुळे सेन्सेक्समध्ये 2000 पॉईंटसची उसळी

4 years ago

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर भांडवली बाजारात सकरात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज तब्बल २,३१५ अंकांनी उसळी घेतली. ४८,७६४ अंकांपर्यंत झेप घेणारा सेन्सेक्स ४८,६०० अंकांवर बंद झाला.

दिवसअखेर २,३१४ अंकांची वाढ नोंदवली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा ६४० पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली. निफ्टी १४,२८१ अंकांवर बंद झाला.

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये जास्त वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एल अँड टी आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

मुंबई शेअर बाजारात आज एकूण 3,129 कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार झाले. यापैकी 1,946 समभागांचे भाव वधारले होते. 203 समभागांच्या किंमतीत फरक पडला नाही.

तर 980 कंपन्यांच्या समभागांचा भाव घसरला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 7 पैशांनी खाली घसरला.

Recent Posts