7th Pay Commission : लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या काही दिवसांपासून DA वाढीची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारकाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये DA मध्ये वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आता लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. सरकारकडून लवकरच DA वाढीची घोषणा केली जाणार आहे.
केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होणार आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मोदी सरकारडून पुढील आठवड्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी DA वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के आहे. जर ४ टक्क्यांनी DA वाढला तर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये बंपर वाढ होईल.
इतका वाढेल पगार
18,000 रुपयांच्या किमान मूळ पगारावर गणना
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये
नवीन महागाई भत्ता (42%) 7560 रुपये महिना
आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) 6840 रुपये महिना
किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = 720 रुपये महिना
वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये वाढ
कमाल मूळ पगाराची गणना 56900 रुपये
कर्मचार्यांचे मूळ वेतन 56900 रुपये
नवीन महागाई भत्ता (42%) 23898 रुपये महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (38%) 21622 रुपये महिना
किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = 2276 रुपये महिना
वार्षिक पगारात वाढ 2276X12 = 27312 रुपये
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे
केंद्र सरकारने जर महागाई भत्ता वाढवला तर ६५ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ४८ लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ दिली जाईल.