भारत

देशात शून्य रुपयांचीही नोट आहे ! केव्हा व कशासाठी छापली होती? जाणून घ्या मजेशीर माहिती

Marathi news : भारतात अनेक चलनी नोटा आहेत. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ रुपयांपासून  ते २ हजार  रुपयांच्या नोटा जारी करते. या नोटांचा वापर करून लोक त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार इतर सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

पण तुम्हाला माहित आहे का की देशात शून्य रुपयांच्या नोटादेखील छापल्या जातात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? पण हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला या शून्य रुपयांच्या नोटांबद्दल सांगणार आहोत-

एका विशेष मोहिमेसाठी छापली होती नोट

शून्य रुपयांच्या नोटेवरही महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला असून तो इतर नोटांसारखा दिसतो. पण शून्य रुपयाची नोट चलनात का आली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या नोटेने तुम्ही खरेदी करू शकता, असं तुम्हाला वाटलं असेल. आरबीआयने ही नोट जारी केलेली नाही. किंबहुना भ्रष्टाचारविरोधी अभियानांतर्गत त्याची निर्मिती करण्यात आली होती.

5 लाख नोटा छापल्या होत्या

भ्रष्टाचाराविरोधात शस्त्र म्हणून एका संस्थेने ही नोट सुरू केली होती. दक्षिण भारतातील एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) २००७ मध्ये ही कल्पना मांडली. तामिळनाडूतील 5th Pillar नावाच्या या NGOने  सुमारे पाच  लाख रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये या नोटा छापण्यात आल्या होत्या.

नोटेवर भ्रष्टाचाराविरोधात संदेश

भ्रष्टाचाराच्या विरोधात बनवलेल्या या नोटेवर अनेक संदेश लिहिले होते, त्यात ‘भ्रष्टाचार संपवा’, ‘कोणी लाच मागितली तर ही नोट द्या आणि प्रकरण आम्हाला सांगा’, ‘मी लाच  घेणार नाही याची शपथ घेतो.’ असे अनेक संदेश लिहिले होते. या शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटोही छापण्यात आला असून नोटेच्या तळाशी उजव्या बाजूला संस्थेचा फोन नंबर आणि ईमेल आयडी छापण्यात आला आहे.

लाच मागणाऱ्यांना दिल्या होत्या नोटा

‘५ वा स्तंभ’ नावाची संस्था शून्य रुपयांच्या नोटा तयार करून लाच मागणाऱ्यांना देत असे. ही नोट भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे प्रतीक होती. तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये या संघटनेची केंद्रे होती. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. राजस्थानमधील बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि पाली येथेही कंपनीची केंद्रे आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Marathi News

Recent Posts