भारत

ISRO Rover Pragyan : वाटेत आला खड्डा, प्रज्ञान रोव्हरने काय केलं असेल ? वाचा इथे

ISRO Rover Pragyan : चंद्रावर मार्गक्रमण करत असताना प्रज्ञान रोव्हरला वाटेत एक मोठा खड्डा लागला. सुमारे ४ मीटर व्यासाचा हा खड्डा रोव्हरपासून ३ मीटर अंतरावर होता. आपल्या वाटेत खड्डा असल्याचे दिसताच प्रज्ञानने दिलेल्या सूचनांचे पालन करत आपला मार्ग बदलला.

आता तो सुरक्षित मार्गाने वाटचाल करत आहे. २७ ऑगस्टच्या या घटनेबाबत इस्त्रोने सोमवारी माहिती दिली. एक्स अकाऊंटवर याबाबत माहिती देताना इस्त्रोने दोन फोटो ट्विट केले.

एका फोटोमध्ये रोव्हरसमोरील खड्डा दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत रोव्हरने मार्ग बदलत केलेल्या मार्गक्रमणाच्या खुणा दिसत आहेत. सहा चाकांचा हा २६ किलो वजनी रोव्हर चंद्रावरील एक दिवसात ( पृथ्वीवरील १४ दिवस) आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे.

रोव्हरवर अल्फा पार्टीकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रस्कोम, अशी दोन उपकरणे आहेत. या उपकरणांच्या मदतीने चंद्रावरील माती, धुळीचे नमुने तपासून तेथील खनिजांच्या अस्तित्वाबद्दल माहिती मिळवण्यात येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts