Upcoming Cars : भारतात सुरुवातीच्या काळात ऑटोमोबाईल क्षेत्रात काही कंपन्यांच्या मोजक्याच कार उपलब्ध होत्या. तसेच या कार खूप लोकप्रिय झाल्या होत्या. मात्र काही दिवस लोकांच्या मनावर राज्य करून या कार बंद झाल्या. याच कारची जागा नवीन गाड्यांनी घेतली.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात हिंदुस्थान मोटर्सची ॲम्बेसेडर कार खूप लोकप्रिय झाली होती. राजकारण्यांपासून ते चित्रपटापर्यंत ही कार फेमस झाली होती. त्यावेळी या कारची किंमतही कमी होती.
सुरुवातीच्या काळात हिंदुस्थान ॲम्बेसेडर, टाटा सिएरा, हिंदुस्तान कॉन्टेसा, मारुती 800, मारुती ओम्नी, मारुती जिप्सी या गाड्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. आता याच कार पुन्हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
हिंदुस्थानचे ॲम्बेसेडर
हिंदुस्थान मोटर्सने १९५६ साली ही कार ऑटोमोबाईल क्षेत्रात सादर केली होती. तसेच ग्राहकांनी या कारला भरभरून प्रतिसाद दिला होता. २०१४ पर्यंत या कारचे उत्पादन सुरु होते. मात्र यानंतर कारचे उत्पादन कंपनीकडून थांबवण्यात आले. आता ही कार इलेक्ट्रिक मॉडेल मध्ये सादर केली जाण्याचा दावा करण्यात येत आहे.
टाटा सिएरा
ही भारतातील पहिली खरी एसयूव्ही कार होती. ही कार 1991 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. भारतीय कंपनीने उत्पादित केलेले हे पहिले ऑफ-रोड स्पोर्ट युटिलिटी वाहन होते. ही कार 2003 मध्ये बंद करण्यात आली.
टाटा मोटर्स सिएरा कार इलेक्ट्रिक कार म्हणून पुन्हा बाजारात आणणार आहे. ऑटो एक्सपोमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. Sierra Electric मध्ये 40.5kWh चा बॅटरी पॅक दिला जाणार आहे, जी 437 किमीची रेंज देईल.
मारुती जिप्सी
मारुती जिप्सीने देखील ग्राहकांना वेड लावले होते. मारुती जिप्सी ही कार देखील अधिक लोकप्रिय झाली होती. आता पुन्हा एकदा ही कार ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण करणार आहे. जिप्सी कारची जागा घेण्यासाठी मारुतीने जिमनी कार ऑटो एक्सपोमध्ये सादर केली आहे.