भारत

High Blood Sugar : मधुमेह रुग्णांसाठी या 3 वनस्पती ठरतायेत रामबाण उपाय; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

High Blood Sugar : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना कमी वयात गंभीर आजार होत आहेत. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार घेतल्याने अनेकजण गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मात्र आपल्या सभोवतालीच त्याचे उपाय आहेत.

मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. मधुमेह रोखण्यासाठी अनेकजण विविध उपाय करत आहेत. डॉक्टारांच्या सल्ल्याने अनेकजण औषधे देखील घेत असतील. मात्र त्यांना पाहिजे असा फरक पडत नसेल.

मात्र काही घरगुती उपाय मधुमेहावर रामबाण इलाज ठरत आहेत. काही जणांचा मधुमेह अनुवांशिक देखील असतो. मात्र चुकीच्या आहार पद्धतीने रतक्तातील साखरेची पातळी वाढवते.

मधुमेहावर आजही ठोस उपाय आलेला नाही. मात्र रोजच्या जीवनात अनेकांनी खाण्यावर नियंत्रण ठेवले तर नक्कीच मधुमेहावर नियंत्रण मिळवता येईल. मधुमेहावर नियंत्रण मिळवता येतील असे काही आज त्याबद्दल काही उपाय सांगणार आहोत.

1. गुळवेल

कोरोनाच्या काळात या वनस्पतीपासून मिळालेल्या औषधी वनस्पतीचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जात होता, परंतु तुम्हाला माहित आहे का की सकाळी उठल्यानंतर गुळवेलचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते.

2. कढीपत्ता

कढीपत्ता सामान्यतः दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये वापरला जातो, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जर मधुमेही रुग्णांना याचा फायदा घ्यायचा असेल तर ते कढीपत्ता चहा बनवून पिऊ शकतात.

3. कडुलिंब

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म प्रत्येकाला माहिती आहेत. ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पाने, फळे, फुले, साल आणि लाकूड हे सर्व औषधी कारणांसाठी वापरले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर त्याची हिरवी पाने चावून खाल्ल्यास ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts