Old Note : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कारण अशी नाणी आणि नोटा चलनातून बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जर तुमच्याकडेही १ रुपयांची ही जुनी नोट असेल तर तुम्हीही लखपती होऊ शकता.
देशात सध्या जुन्या नोटा आणि नाणी जास्त पैशांना विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशा नोटा विकत घेऊन त्याबदल्यात हजारो लाखो रुपये दिले जात आहेत. मात्र अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ होत चालली आहे.
अशा दुर्मिळ नोटा आणि नाणी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. काही ऑनलाईन वेबसाईट वर तुम्ही अशा नोटा आणि नाणी विकू शकता. यासाठी तुम्हाला थोडीशी प्रक्रिया करावी लागेल.
ही १ रुपयांची नोट तुमचे नशीब बदलेल
अनेकांना अशी जुनी नाणी आणि नोटा जपून ठेवण्याचा किंवा त्यांचा संग्रह करण्याची आवड असते. मात्र अनेकांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा आणि नाण्याची किंमत माहिती नसते. मात्र अशा नाण्यांची आणि नोटांची बाजारात किंमत लाखोंच्या घरत आहे.
१ रुपयांच्या नोटेवर या गोष्टी असाव्यात
या एक रुपयाच्या नोटेवर राज्यपाल एचएम पटेल यांची स्वाक्षरी आणि अनुक्रमांक 123456 लिहिलेला आहे, जर तुमच्या नोटेमध्ये हे वैशिष्ट्य असेल आणि ही नोट 1957 मधील असेल तर ही नोट तुम्हाला 400000 रुपयांच्या वर पैसे कमवून देऊ शकते.
याठिकाणी विका जुन्या नोटा आणि नाणी
जर तुमच्याकडे जुनी नाणी आणि नोटा असतील तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईट त्या विकून चांगले पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. तसेच तुमच्याकडे असलेल्या नोटांचा फोटो याठिकाणी अपलोड करावे लागतील.
तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर ज्या ग्राहकाला तुमची नोट खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या नोटेची किंमत ठरवू शकता. तसेच काही वेळा तुमची फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे सावधानता बाळगून तुम्ही नोटेची विक्री करावी.