Vivo Smartphone : Vivo कंपनीचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून नवीन 5G स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनपेक्षा यामध्ये वेगळे फीचर्स देण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनचे नाव Vivo Y55s 5G असे आहे. हा स्मार्टफोन तैवानमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला चांगला बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. तसेच 50MP कॅमेरा आणि FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कॅमेराही मजबूत देण्यात आला आहे. 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स उपलब्ध आहेत. समोरच्या बाजूला 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्ट करत आहे. दोन्ही 5G सपोर्ट करतील. ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक, इतर वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आला आहे.
किंमत
Vivo Y55s 5G च्या 4 GB RAM + 128 GB स्टोरेजची किंमत NTD 7,990 (रु. 21 हजार) आणि 6 GB RAM + 128 GB स्टोरेजची किंमत NTD 8,490 (रु. 22, 670) आहे. फोन दोन रंगात येतो.
तपशील
या स्मार्टफोनला 60hz रिफ्रेश रेट, Tisht च्या स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 6.55-इंचाचा LCD डिस्प्ले मिळत आहे. डिव्हाइसच्या उजव्या बाजूला असलेले पॉवर बटण फिंगरप्रिंट सेन्सरसह एकत्रित केले आहे. फोन डायमेंसिटी 700 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोन 4GB आणि 6GB वेरिएंटसह येतो, ज्यामध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.