Steel and Cement Price : देशात लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसांत बांधकाम क्षेत्रात मंदी येते त्यामुळे बांधकाम साहित्य स्वस्त होत असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत बांधकाम क्षेत्रात तेजी येते. त्यामुळे घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य महाग होते.
जर तुम्ही आताच्या घडीला घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी घर बांधण्याची सुवर्णसंधी आहे. कारण सिमेंट आणि स्टीलचे दर कमी आहेत. अशातच तुम्ही घर बांधण्याचे साहित्य खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल.
अनेकांना स्वतःचे छोटे का होईना घर बांधायचे असते. मात्र कमी बजेट असल्यामुळे घर बांधणे शक्य होत नाही. मात्र कमी बजेट असणाऱ्यांसाठी घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य कमी दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
सध्या जरी घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती कमी असल्या तरी उन्हाळा सुरु होताच घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढणार आहेत. अनेक शहरांमध्ये स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी झाल्या आहेत.
घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक आहेत. याच्या किमती वाढल्याने अनेकांना घर बंधने कठीण होते. मात्र सध्या याच्या किमती सामान्य आहेत त्यामुळे तुम्ही हे खरेदी करू शकता.
नवीन वर्षात स्टील किमती
नवीन वर्षात स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण होईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र असे काहीही झाले नाही, आज नवीन वर्षाचा दुसरा महिना सुरू झाला असून स्टीलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. रोजच्या स्टीलच्या किमतीत थोडा फरक आहे.
स्टीलच्या किमती
10 ते 25 मिमी स्टील किंमत- 65200 रुपये प्रति क्विंटल
8 ते 32 मिमी स्टील किंमत- 66700 रुपये प्रति क्विंटल
6 मिमी स्टील किंमत- 66700 रुपये प्रति क्विंटल
नवीनतम सिमेंट किंमत
43 ग्रेड 330-370 मध्ये acc सिमेंटची किंमत
53 ग्रेड 410-455 मध्ये acc सिमेंटची किंमत