Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम राबविण्यात येतात व या माध्यमातून अशा घटकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचवावे हा त्यामागचा उद्देश आहे.
महिलांच्या बाबतीत देखील अनेक महत्त्वाच्या अशा योजना असून त्यातून महिलांची प्रगती तसेच महिलांचा विकास व्हावा व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अशा योजना या खूप महत्त्वाच्या आहेत.
कारण जर आपण सध्या पाहिले तर महिला आणि मुले हा भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु आजदेखील हा समूह एक असुरक्षित समूह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महिलांच्या सुरक्षा करिता महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला वर्गाचे सक्षमीकरणासंबंधी अनेक योजना उपलब्ध आहेत. त्या योजनांची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत.
महिलांसाठी फायद्याचे आहेत या योजना
1- बेटी बचाव बेटी पढाओ योजना– साधारणपणे 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती व या योजनेच्या माध्यमातून गर्भपात प्रतिबंध करणे व बालवयात मुलींची सुरक्षा, मुलींचे शिक्षण व मुलींचे कल्याण सुनिश्चित करणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर या माध्यमातून लक्ष दिले जाते.
2- वन स्टेप सेंटर स्कीम– या योजनेची सुरुवात देखील 2015 या वर्षी करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांनी हिंसाचाराचा सामना केलेला आहे अशा महिलांची दखल घेतली जाते व या महिलांना हिंसाराची तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली जाते. अशाप्रकारे पीडित महिलांचे सामाजिक व मानसिक समुपदेशन करण्यात देखील या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतो.
3- महिला हेल्पलाइन सुविधा– ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली असून या अंतर्गत एखाद्या हिंसाचाराने पिडीत अशा महिलांच्या सुरक्षा करिता 24 तास टोल फ्री दूरसंचार सेवा या माध्यमातून देण्यात येते. तसेच गरज असेल तर पोलीस / हॉस्पिटल/ रुग्णवाहिका सेवा /
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण / संरक्षण अधिकारी यासारख्या सेवा संस्थेची मदत देखील महिलांना घेता येऊ शकते. एखादी पीडित महिला ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना तसेच कार्यक्रम व मदत सेवा इत्यादींची माहिती देखील या योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येते.
4- उज्वला योजना– या योजनेची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली व या अंतर्गत महिलांनी मुलांचे लैंगिक शोषण व तस्करी थांबवता यावी यावर लक्ष केंद्रित केले जाते. पीडितांचे ज्या ठिकाणी शोषण होत असेल अशा ठिकाणाहून त्यांची सुटका करणे व त्यांना सुरक्षित ठेवणे हे या योजनेचे प्रमुख ध्येय आहे. इतकेच नाही तर पीडितांना अन्न, वस्त्र तसेच निवारा व कायदेशीर मदत तसेच मार्गदर्शन देणे व वैद्यकीय उपचार इत्यादी आवश्यक गोष्टी देखील या माध्यमातून मिळतात.
5- स्टेप अर्थात महिलांचे प्रशिक्षण आणि रोजगार कार्यक्रमास समर्थन– ही योजना 1986-87 साली सुरू करण्यात आलेली आहे व रोजगार निर्माण करणाऱ्या कौशल्यांवर भर देणारी ही योजना आहे. देशातील 16 आणि त्यापेक्षा पुढील वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
6- निर्भया योजना– 2012 या वर्षी ही योजना आणण्यात आली व महिलांना विविध स्तरांवर सुरक्षा देण्याकडे लक्ष दिले जाते. तसेच या योजनेमध्ये पीडित महिलांची ओळख लपवली जाऊन त्यांच्या गोपनीयतेची सुनिश्चिती देखील केली जाते.
याशिवाय इतर अनेक योजना या महिला आणि मुलांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत.