Tourist Place In Srinagar:- जम्मू आणि काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग किंवा पृथ्वीचा स्वर्ग असे म्हटले जाते आणि त्यामागे कारणे देखील तसेच आहेत. काश्मीरला जितके निसर्गाने भरभरून दिलेले आहे तितके पृथ्वीतलावरील अन्य कोणत्याही ठिकाणाला दिलेले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगातील लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी काश्मीरला भेट देतात.
तसेच काश्मीरच्या सौंदर्यामुळे भारतातील सिनेसृष्टीतील अनेक महत्त्वपूर्ण सिनेमांची शूटिंग देखील काश्मीरमध्ये होते. काश्मीरमधील जर आपण श्रीनगर पाहिले तर त्याचा इतिहास खूप जुना असून या ठिकाणी पारंपारिक काश्मिरी हस्तकलेचे आणि कोरडे फळांसाठी असलेली श्रीनगरची महती संपूर्ण जगात आहे.
त्यामुळे बरेच जण श्रीनगरला भेट देतात व निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. श्रीनगरला गेल्यावर त्या ठिकाणी काही अशी सुंदर ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला निसर्ग काय असतो हे नेमकेपणाने कळते. त्यामुळे तुमचा देखील श्रीनगरला जायचा प्लॅन असेल तर लेखात दिलेली सुंदर ठिकाणी तुम्ही नक्कीच पहावी.
श्रीनगरच्या आसपास आहेत ही सुंदर ठिकाणे
1- वूलर सरोवर (लेक)- बांदीपोरा जिल्ह्यामध्ये हा तलाव असून आशिया खंडातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील तलावांपैकी एक आहे. सतलज नदीच्या काठावर श्रीनगर पासून साधारणपणे 65 किलोमीटर अंतरावर हे वूलर लेक पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
तुम्हाला जर निसर्गाचे सौंदर्य तुमच्या कॅमेरामध्ये कैद करायचे असेल तर यापेक्षा उत्तम जागा नाही. त्यामुळे काश्मीर किंवा श्रीनगर फिरायला गेला तर वूलर तलाव नक्कीच पहावा. तसेच या तलावाच्या अवतीभवती जामिया मशिद तसेच मनसबळ आणि खीर भवानी मंदिर देखील पाहण्यासारखे आहेत. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य व्यक्तीला अक्षरशः मोहित करते.
2- अरु व्हॅली– श्रीनगर पासून साधारणपणे शंभर किलोमीटर अंतरावर असलेले अनंत नाग जिल्ह्यातील अरु खोरे काश्मीर मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असून साहसी पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
या ठिकाण पासून तुम्ही पहलगमला जाऊन हे सुंदर शहर पाहू शकता व याचे अंतर बारा किलोमीटर आहे. अरु व्हॅलीमध्ये गेल्यावर तुम्ही हायकिंग,स्किईंग तसेच हॉर्स रायडिंग, कॅम्पिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच या ठिकाणाच्या आजूबाजूला बईसरण आणि बेताब व्हॅली व चंदन वारी तुम्ही पाहू शकता.
3- मोगल गार्डन– काश्मीर खोऱ्यामधील मोगल गार्डन हे एक आश्चर्यकारक स्थान म्हणून ओळखले जाते. हे एक सुंदर पर्यटनासाठीचे ठिकाण असून पर्यटकांमध्ये याचे विशेष आकर्षण आहे. ठिकाणी हिरव्यागार बागा असेच देशी फुलांच्या प्रजातीमुळे हा भाग अतिशय सुंदर दिसतो.
दाल सरोवराजवळ असलेले हे एक ठिकाण मोठे आकर्षणाचा विषय आहे. मुगल गार्डन प्रामुख्याने शालीमार आणि निषात बाग, देवदार फॉरेस्ट हिल्स आणि ट्यूलिप फुलांसाठी ओळखले जाते.
4- परी वाडा– श्रीनगर मधील हे एक महत्त्वाचे ठिकाण असून परि महल चष्मेशाही गार्डनच्या शेजारी असून एक ऐतिहासिक स्मारक आहे. वास्तुशास्त्राच्या क्लासिक इस्लामिक शैलीमध्ये बांधलेल्या या वाड्याच्या मागे एक आकर्षक इतिहास देखील लपलेला आहे.
हे ठिकाण परीक्षांचे घर म्हणून देखील ओळखले जाते व या ठिकाणी झबरवान डोंगराच्या उजवीकडे सहा अंगभूत टेरेस गार्डन आहेत व मोगल जीवनशैलीचे झलक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. शिवाय या ठिकाणी अनेक सुंदर बाग बगीचे असल्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी खूप आनंद मिळतो.