Top Car Features : आजकालच्या कारमध्ये अनेक नवनवीन फिचर जोडण्यात येत आहेत. त्यामुळे कार दिवसेंदिवस अधिक उत्कृष्ट होत आहेत. आजकाल अनेकजण कार खरेदी करण्यावर अधिक पैसे खर्च करत आहेत. प्रत्येकाला जास्तीतजास्त वैशिष्ट्ये असणारी कार हवी आहे.
कार खरेदी करताना प्रत्येकजण अधिकाधिक फीचर्स असणारी कार निवडत आहे. पण आजकाल कारमधील ४ फीचर्स लोकांना सर्वाधिक आकर्षित करत आहेत. तसेच हे फीचर्स असणाऱ्या कार ग्राहकांकडून सर्वाधिक खरेदी केल्या जात आहेत.
तसेच अनेक कंपन्यांच्या नवनवीन कारमध्ये अधिकाधिक वैशिष्ट्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना जास्तीजास्त फीचर्स असणाऱ्या कार खरेदी करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. नवीन कार खरेदी करताना ग्राहक चारही बाजूंनी विचार करत कार खरेदी करत असतो.
खालील फीचर्स असणाऱ्या कार ग्राहकांना सर्वाधिक आकर्षित करत आहेत
१. पॅनोरॅमिक सनरूफ
आजकाल ग्राहकांना कारमधील सर्वाधिक आकर्षित करणारे फीचर्स म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफ. कारमधील या फीचर्सची मागणी अधिक वाढत चालली आहे. सिंगल पेन सनरूफच्या तुलनेत पॅनोरामिक सनरूफ अधिक उघडते. Creta, Harrier आणि Safari, XUV700 सारख्या कारला पॅनोरामिक सनरूफ मिळते.
२. 360 डिग्री कॅमेरा
कारमधील दुसरे फीचर्स म्हणजे 360 डिग्री कॅमेरा. हे फीचर्स देखील सध्या ट्रेंडिंगमध्ये सुरु आहे. गर्दीच्या ठिकाणावरुन आणि कार पार्क करण्यास या 360 डिग्री कॅमेराची मदत होते. हे वैशिष्ट्य Baleno, Seltos, Kicks, XUV700 सारख्या कारमध्ये देण्यात येत आहे.
३. HUD डिस्प्ले
हेड-अप डिस्प्ले (HUD) मारुती सुझुकी बलेनो, ब्रेझा आणि किया सेल्टोस सारख्या कारमध्ये देण्यात येत आहे. एचयूडीचे दोन प्रकार आहेत – प्रोजेक्शन आधारित (एलईडी/लेसर वापरुन) आणि प्रतिबिंब आधारित (डिजिटल डिस्प्ले वापरुन). हे एक सर्वाधीक लोकप्रिय कार वैशिष्ट्य बनले आहे.
४. व्हेंटिलेटेड सीट्स
व्हेंटिलेटेड सीट्स हे देखील कारमधील सर्वाधिक लोकप्रिय फिचर आहे. हे फीचर्स Nexon, Harrier, Soent, Kushaq, Taigun, Verna, Creta, Carens, Seltos सारख्या कारमध्ये सर्व ठिकाणी वायु परिसंचरण करण्यास मदत करते.