Vande Bharat:देशी बुलेट ट्रेन वंदे भारतचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रेन वंदे भारत रेल्वेला गुजरातमध्ये दोन दिवसांत दोन अपघात झाले. विशेष म्हणजे पहिल्या अपघातात एका म्हशीला तर दुसऱ्या अपघातात एका गायीला रेल्वेचे धडक बसली.
या किरकोळ अपातातही रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याने तो चर्चा विषय ठरला आहे. शुक्रवारी गांधीनगरहून मुंबईकडे जाताना कंजारी आणि आणंद स्टेशनदरम्यान हा अपघात झाला.
एक दिवस गुरूवारी आधीट्रेन मणिनगर स्टेशनजवळ म्हैशींच्या कळपाला धडकली होती. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ने या म्हैशींच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अपघातामुळे गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. मात्र सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या नव्या आणि अपग्रेडेड व्हर्जनला ३० सप्टेंबर रोजी हिरवा कंदील दाखवून ही सेवा सुरू करण्यात आली होती.
देशात धावणारी ही तिसरीवंदे भारत ट्रेनआहे. ही गाडी १८० किलोमीटर प्रतितास स्पीडने धावू शकते. मात्र सध्या ही गाडी १३० कमाल स्पीडने धावत आहे.