Two Nation Village:- भारत म्हटले म्हणजे जगाच्या पाठीवरील असा एकही देश नाही की भारता इतकी प्रत्येक बाबतीत विविधता असेल. भारतामध्ये सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, परंपरांच्या बाबतीत प्रत्येक राज्याराज्यामध्ये विविधता दिसून येते. भौगोलिक बाबतीत असलेल्या विविधतेचा विचार केला तर तुम्हाला काही किलोमीटर गेल्यावर ही विविधता जाणवते.
तसेच सण उत्सवांमध्ये देखील विविधता असून प्रत्येक राज्यानुसार काही वेगवेगळ्या प्रकारचे सण त्यांच्या परंपरेनुसार साजरे केले जातात. तसेच भारताच्या अवतीभवती असलेल्या देशांचा विचार केला तर भारताच्या सीमेला पाकिस्तान, चीन या देशांच्या सीमा तर आहेत.
परंतु त्या व्यतिरिक्त नेपाळ तसेच बांगलादेश व म्यानमार सारख्या देशांच्या देखील सीमा लागून आहेत. या सगळ्या सीमेवर देखील काही गोष्टी खूप अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारे आहेत. याच अनुषंगाने जर आपण भारतातील एका गावाचा विचार केला तर हे गाव त्याच्या एका वेगळ्या कारणामुळे खूप चर्चेत आहे. या एकाच गावामध्ये तब्बल दोन देश येतात. नेमके हे गाव चर्चेत येण्यामागे नेमके काय कारण आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
लोंगवा गाव आहे या कारणामुळे चर्चेत
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यामध्ये लोंगवा हे गाव असून हे देशातील शेवटचे गाव म्हणून देखील ओळखले जाते. या गावाला मोठे निसर्ग सौंदर्य लाभलेले असून निसर्ग सौंदर्यामुळे हे गाव खूप सुंदर दिसते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी दिसून येते.
या गावाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव भारत आणि म्यानमार सीमेमुळे दोन भागात विभागलेले आहे. यामुळेच लोंगवा या गावातील नागरिकांना भारताच्या नागरिकत्वा व्यतिरिक्त म्यानमारचे देखील नागरिकत्व मिळालेले असल्यामुळे दुहेरी नागरिकत्वाचा फायदा या ठिकाणच्या रहिवाशांना मिळालेला आहे.
एवढेच नाही तर या गावातील नागरिक दोन्ही देशांमध्ये फिरू शकतात.तसेच या गावातील बऱ्याच घरांचा काही भाग भारतामध्ये आहे तर काही म्यानमार या देशात आहे. एवढेच नाही तर या गावातील मुले भारतातील शाळेत जातात तर काही मुले म्यानमार मधील शाळेत शिकतात.
तसेच या गावांमधील अनेक घरे दोन भागात विभागलेले असून काही घरांचे स्वयंपाक घर भारतामध्ये आहे तर बेडरूम म्यानमार मध्ये आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या घरांमधील लोक भारतामध्ये जेवतात आणि झोपायला म्यानमार मध्ये झोपतात असं या बाबतीत म्हटलं जातं.
गावचा प्रमुख देखील भारतामध्ये जेवतो आणि झोपायला म्यानमार मध्ये झोपतो. या ठिकाणी कोण्याक ही भारतातील सर्वात दुर्मिळ आदिवासी जमात असून राजा आंग यांचं प्रतिनिधित्व करतो.
या आदिवासी जमातीचे वैशिष्ट्ये म्हणजे हे लोक शत्रूच्या डोक्यांच्या कवट्या गोळा करतात व याचा हार बनवून त्या गळ्यात घालतात. या गावाची लोकसंख्या जवळपास 5000 असून 742 घर भारतामध्ये आहेत आणि 224 घरे ही म्यानमारमध्ये आहेत.