Vande Bharat Train : देशात सध्या पावसाळा सुरु झाला आहे. अनेक भागात सध्या जोरदार पासून सुरु झाला असून हवामान खात्याने पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पासून पडेल असे सांगितले आहे. अशा वेळी सर्वात जास्त अडचणी या रेल्वेला निर्माण होत असतात.
यामुळे कोकण रेल्वेने मान्सूनच्या पूर्वतयारीसंदर्भात एक प्रसिद्धी जारी केली आहे. 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत गाड्या पावसाळ्याच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातात. असे या पत्रकात सांगितले आहे.
तसेच या कालावधीत, जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा गाड्या 40 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाहीत. अशा स्थितीत वंदे भारत एक्स्प्रेस चालवली तर तिला 40 किमी/ताशी वेगमर्यादाही पाळावी लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, येत्या 15 दिवसांत वंदे भारत एक्स्प्रेस न धावल्यास पावसाळ्यानंतर तिची नियमित सेवा सुरू होऊ शकते. कोकण रेल्वेतील घाट भागामुळे पावसाळ्यात खडक घसरणे, रुळावर चिखल साचणे किंवा रुळाखालून माती वाहून जाणे या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्याचे वेळापत्रक जारी केले जाते आणि त्यानुसार गाड्याही धावतात.
रेल्वेची काय तयारी आहे?
कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक गिरीश आर. करंदीकर यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात ठराविक मार्गदर्शक तत्त्वानुसार कामे केली जातात. यावेळी संपूर्ण मार्गावर गस्तीसाठी 673 जवान तैनात करण्यात आले आहेत.
खडक पडण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणी चोवीस तास कर्मचारी तैनात करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी डोंगरी टोळ्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे प्रकाश कमी झाल्यास सर्व लोको पायलटना 40 किमी/ताशी वेगाने जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत वेर्णा आणि रत्नागिरी स्थानकावर अपघात निवारण वैद्यकीय गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्येही ऑपरेशनची व्यवस्था केली जाईल.
पावसाची तयारी
कोकण रेल्वेवर भरपूर पाऊस पडतो. पर्जन्यमानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी येथे पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. अशा प्रकारे रेल्वेनी आगामी पाऊसाची पूर्ण तयारी केलेली आहे.