Vande Bharat Train:- केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील 34 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेली असून त्यातील महाराष्ट्रात देखील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
प्रवाशांसाठी अत्यंत आरामदायी आणि वेगवान प्रवासाची अनुभूती देण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता वाढत आहे. तसेच प्रवाशांकडून देखील वंदे भारत ट्रेनला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीचा सण आता सुरू असल्यामुळे आणि पुढील काळात येणाऱ्या काही सणांच्या कालावधीत भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून सणासुदीसाठी स्पेशल वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व यानुसारच आता देशातील सर्वाधिक अंतर कापणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील चालवली जात आहे.
देशातील सर्वाधिक अंतर कापणारी वंदे भारत ट्रेन
सणासुदीच्या कालावधीमध्ये प्रवासांची जी काही गर्दी होते ती लक्षात घेता भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून विशेष अशा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या अनुषंगानेच नवी दिल्ली ते बिहार राज्याची राजधानी असलेल्या पाटणापर्यंत वंदे भारत महोत्सव विशेष ट्रेन चालवण्यात येत आहे व ही वंदे भारत ट्रेन दिल्ली ते पाटणा हे 994 किलोमीटर आहे व हे अंतर बारा तासात पूर्ण करू शकते असे देखील सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे या ट्रेनची बुकिंग देखील सध्या सुरू आहे. नवी दिल्ली ते पाटणदरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन देशातील सर्वाधिक अंतर आपणारी ट्रेन आहे. या वंदे भारतीय एक्सप्रेस सध्या शताब्दी मार्गावर चालवल्या जात असून येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची देखील रेल्वेची प्लॅनिंग आहे.
नवी दिल्ली ते पाटणा वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
ही वंदे भारत ट्रेन नवी दिल्लीहून सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी निघणार व त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता पाटणा बिहार येथे पोहोचेल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी पाटणा या ठिकाणाहून सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी ही ट्रेन निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.
किती आहेत तिकीट दर?
नवी दिल्ली ते पाटणा यादरम्यान प्रवास करण्यासाठी एसी चेअर कार कोचचे तिकीट दर म्हणजेच भाडे 2355 आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 4410 ठेवण्यात आलेले आहे.