Vastu Tips : आजकाल अनेकांच्या घरात सर्व काही असते मात्र सुख शांती नसते. त्यामुळे अनेकजण त्रस्त झालेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरात काही दोष असल्याने घरात सुख शांती लाभत नाही. तुम्हालाही घरात सुख-शांती हवी असले तर त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही उपाय करावे लागतील.
घरामध्ये प्रत्येकाला सुख-शांती हवी असते. प्रत्येक्जण घरात सुख-शांती कशी लाभेल आणि आर्थिक फायदा कसा होईल याचा विचार करत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय केल्याने तुमच्या घरात सुख-श्नती तर लाभेलच पण माता लक्ष्मी देखील वास करेल.
ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते केल्याने तुम्हाला नक्कीच सुख-शांती लाभेल. यासाठी तुम्हाला कसलाही धार्मिक विधी करण्याची गरज नाही. फक्त घरात हे उपाय करण्याची गरज आहे.
कौटुंबिक शांतीसाठी उपाय
१. तुम्हालाही कौटुंबिक शांती हवी आहे तर तुम्ही तुमच्या व्हरांड्यात किंवा बाल्कनीमध्ये विंड चाइम लावा. याचा चांगला आणि सकारत्मक प्रभाव पडतो. यामधून जेव्हा वारा वाहतो तेव्हा त्यातून सांगितलं बाहेर पडते. तसेच घराच्या मध्यभागी स्फटिक लटकवा.
हे स्फटिक दर रविवारी दुपारी 12 वाजता सुमारे 3 ते 4 तास सूर्यप्रकाशात ठेवा आणि त्यानंतर पुन्हा ते घरात आणून लटकवा. यामुळे तुमच्या कुटुंबाबत जे काही वाद असतील ते संपतील आणि घरामध्ये शांती लाभेल.
२. तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास कधीही घाण ठेऊ नका. शक्यतो घराच्या उत्तर-पश्चिम कोपर्यात कधीही घाण ठेवू नका. तसेच या ठिकाणी कधीही अंधार नसावा. जर असे झाल्यास घरातील महिलांना आजार होऊ शकतात.
त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. तसेच घरामध्ये वाद देखील होऊ शकतात. घराच्या उत्तर-पश्चिम कोपर्यात तुम्ही स्वछता ठेवली आणि त्या ठिकाणी दिवाबत्ती लावली तर घरामध्ये नेहमी महिला आणि सर्वजण निरोगी राहतील.
३. अनेकदा तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी मुख्य गेट किंवा दरवाजासमोर शू रॅक ठेवलेले पहिले असेल. पण जर तुम्ही असे केल्यास तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरच्या मुख्य गेटपाशी नेहमी स्वछता ठेवावी.