भारत

Vivo Upcoming Smartphone : भारतात लॉन्च होणार विवोचा जबरदस्त बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Upcoming Smartphone : विवो कंपनीच्या स्मार्टफोनला भारतामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच कमी कालावधीत विवो कंपनीचे अनेक स्मार्टफोन भारतामध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. तसेच आता कंपनीकडून आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे.

विवो कंपनीचे स्मार्टफोन जबरदस्त फीचर्स आणि सर्वोत्तम कॅमेरासाठी ओळखले जातात. आता कंपनीकडून Vivo T2 सिरीज भारतात लवकरच लॉन्च केली जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतीयांच्या बजेटमधील असणार आहे.

विवो कंपनीकडून भारतात Vivo Y78 5G हा स्मार्टफोन मिड-बजेट स्मार्टफोन लॉन्च केला केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे कमी पैशात जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Vivo Y78 5G रिलीज तारखेची भारतात किंमत

विवो कंपनीकडून Y78 5G ही सिरीज असणारा स्मार्टफोन 17 मे 2023 रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. 8 GB रॅम / 128 GB इंटरनल स्टोरेज बेस वेरिएंट सह Vivo Y78 5G लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo Y78 5G या स्मार्टफोनमध्ये ब्लॅक आणि गोल्ड असे दोन कलर ऑप्शन दिले जाऊ शकतात. कंपनीकडून हा स्मार्टफोन 24,789 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo Y78 5G तपशील

Vivo Y78 5G मध्ये 1080 x 2408 पिक्सेलच्या सभ्य रिझोल्यूशनसह 6.58-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. हा मोबाईल Android 12 वर चालेल. हे MediaTek Dimensity 1100 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि त्यात octa-core (2×2.2GHz Cortex-A76 आणि 6×2.0GHz Cortex-A55) CPU आणि Mali-G77 GPU असेल.

विवोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 50 MP (f/1.8) रियर कॅमेरा आणि 16 MP (f/2.0) फ्रंट कॅमेरा सह येणार आहे. यामध्ये एलईडी फ्लॅश, एचडीआर, पॅनोरमा यांसारख्या कॅमेरा फीचर्सचा समावेश असू शकतो. या मॉडेलमध्ये कॉल रेकॉर्ड, मेसेजिंग, फोनबुक, एफएम रेडिओ, गेम्स, स्पीकर्स, EDGE, GPRS, 2G, 3G, 4G, 5G, फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर यांचा समावेश असेल.

Vivo Y78+ 5G लॉन्च किंमत

विवो कंपनीकडून Vivo Y78+ 5G हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 8 GB RAM + 128 GB स्टोरेजची किंमत 1,599 युआन आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 1799 युआन आहे. तर, 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 1,999 युआन आहे. लवकरच भारतात हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts