Pitra Dosh Remedies : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला खूप महत्व असते. तसेच हिंदू धर्मात मोठमोठ्या पूजा पाठ केले जातात. मात्र तुम्ही अनेकदा पितृदोष हा शब्द ऐकला असेल. तुमच्याही घरात पितृदोष असेल तर काही उपाय केल्याने तुमची यापासून सुटका होईल.
नवीन वर्ष २०२३ मधील सोमवती अमावस्या 20 फेब्रुवारी म्हणजे उद्या आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावास्येला खूप महत्व असते. या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर तुम्हाला नक्कीच पितृ दोषातून मुक्ती मिळेल. यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आले आहे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय केले तर तुम्हाला कालसर्प दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळेल. तसेच तुमच्या घरात सुख शांती नांदेल. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय
ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार सोमवती अमावस्येला तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी आणि दूध अर्पण करावे. यानंतर पाच प्रकारची मिठाई तिथे ठेवावी. या ठिकाणी दिवा लावा तसेच भगवान विष्णूचे ध्यान करा आणि तेथे एक पवित्र धागा अर्पण करा.
ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करताना पीपळाच्या झाडाजवळ किमान १०८ परिक्रमा करा. हे उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.
पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय
जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर तुम्ही त्याचा प्रभाव कमी करू शकता. यासाठीही ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. यासोबतच हात जोडून जाणून-बुजून झालेल्या चुकांसाठी पूर्वजांची माफी मागावी.
कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय
सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक करावा. यानंतर तीर्थस्थळी जाऊन चांदीच्या नाग-नागिनीची पूजा करून नदीत सोडून द्या. कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा. याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला धन आणि धान्य मिळते.