SIP Investment : गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. SIP मधील गुंतवणूक कमी काळात तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करेल. अलीकडे अनेकजण SIP मध्ये गुंतवणूक चांगला फायदा मिळवत आहेत.
म्युच्युअल फंड खाते उघडून तुम्ही आवडीच्या म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या इच्छेनुसर गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडचे खाते तुम्ही तुमच्या बँकेशी देखील लिंक करू शकता. ५०० रुपयांच्या गुंतवणुकीपासून गुंतवणूकदारांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
SIP मध्ये गुंतवणुकीचे फायदे
जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर याध्ये जोखीम कमी आहे. मार्केट क्रॅशचा धोकाही कमी आहे, यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे.
गुंतवणूकदार कोणत्याही व्यत्ययाशिवाय SIP अंतर्गत दर महिन्याला छोट्या रकमेत गुंतवणूक करू शकतात. एखादी व्यक्ती त्याच्या बँक खात्यातून स्वयं-डेबिटसाठी फंड हाऊसला स्थायी सूचना देखील देऊ शकते.
SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. याद्वारे तुमचा परतावा अनेक पटीने वाढतो. म्हणजेच, त्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला मूळ रकमेवर व्याज मिळते.
असे व्हाल करोडपती
जर तुम्ही २० वर्षे दरमहा 5500 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही करोडपती बानू शकता. तुम्हाला दरवर्षी 9% SIP रक्कम वाढवावी लागेल. यामधून तुम्हाला अधिक फायदा मिळेल.
२० वर्षासाठी तुम्ही दरमहा ५५०० रुपयांची गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला वार्षिक १२ टक्के परतावा मिळणे अपेक्षित आहे. 20 वर्षातील तुमची एकूण गुंतवणूक रु. 12 लाख होईल आणि कार्यकाळाच्या शेवटी जमा झालेला निधी सुमारे रु. 50 लाख होईल. SIP रकमेत 10% वाढीसह, तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम 34.36 लाख रुपये होईल. 20 वर्षांच्या अखेरीस, तुमचे कॉर्पस सुमारे 1 कोटी रुपये होईल.