Aadhaar Card Update : अनेकांच्या आधार कार्डवर खूप जुना फोटो आहे. काही वेळा आधारकार्ड पाहिल्यानंतर स्वतःलाच स्वतः ओळखू येत नाही. तसेच अनेकदा मित्रांनी आधारकार्डवरील फोटो पाहिल्यानंतर चिडवत असतात. मात्र आता तुम्ही सहज घरबसल्या आधारकार्डवरील फोटो बदलू शकता.
देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कुठेही शासकीय किंवा खाजगी काम असल्यास कागदपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. त्यामुळे प्रत्येकाकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
आता घरबसल्या तुम्ही आधारकार्डवरील जुना फोटो बदलू शकता. ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या फोटो बदलता येऊ शकतो. तसेच बदललेला फोटो काही दिवसांत अपलोड देखील होऊ शकतो.
आधारकार्डवरील फोटो बदलण्यासाठी ही सोपी पद्धत वापरा
UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा किंवा https://uidai.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
आता ‘अपडेट आधार’ पर्यायावर क्लिक करा.
आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा आणि आवश्यक तपशील भरा.
जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर फॉर्म सबमिट करा.
उपस्थित आधार कर्मचारी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे सर्व तपशीलांची पडताळणी करेल.
कर्मचारी नवीन छायाचित्रावर क्लिक करेल जो तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट होईल.
100 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.
आधार कर्मचारी तुम्हाला एक पोचपावती आणि अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) देईल.
तुमचा फोटो ९० दिवसांत अपडेट केला जाईल
आधार कार्ड ट्रॅकिंग
आता UIDAI ने तुमच्यासाठी खास सुविधा आणली आहे. जर तुम्ही नवीन आधारकार्ड बनवले असेल तर त्यासाठी आधार कार्ड ट्रॅक पर्याय आणला आहे. या पर्यायामुळे तुम्ही सहजपणे आधारकार्ड बनले आहे की नाही किंवा त्याची स्थिती पाहू शकता.