Dawood Ibrahim Death News : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सध्या सोशल मीडिया मध्ये खूपच चर्चा पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला तर दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला आहे. विष प्रयोगामुळे त्याची प्रकृती पूर्णपणे खालावली गेली आहे.
सध्या त्याच्यावर पाकिस्तान येथील कराची मध्ये उपचार सुरू आहेत. दाऊद इब्राहिम पाकिस्तान मधील एका मोठ्या रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून उपचार घेत आहे, तिथे कडक सेक्युरिटी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. युट्युब, ट्विटर यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील बंद आहेत. परिणामी पाकिस्तानात काहीतरी भयंकर घडले आहे असा दावा तेथील पत्रकारांनी केला आहे. पाकिस्तानात असे काही घडले आहे जे तेथील सरकारला लपवायचे असल्याने तेथे सोशल मीडिया आणि इंटरनेट बंद असल्याचा दावा काही तज्ञांच्या माध्यमातून केला जात आहे.
दरम्यान विषबाधा झाल्याची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊदला विष प्राशन केल्याचा दावा तर कालपासूनच केला जात आहे. आज सकाळपासून मात्र या चर्चांना अधिक उधाण आल आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर अनेक लोक दाऊदला विषबाधा झाल्याचा दावा करत आहेत.
दाऊदूची प्रकृती अत्यंत नाजूक झाली असल्याचा दावा केला जात असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचेही काही लोक सांगत आहेत. विष प्रयोग झाल्यानंतर उपचारादरम्यान कुख्यात अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम वारला असल्याचे सोशल मीडियामध्ये बोलले जात आहे. डी कंपनीचा सर्वेसर्वा दाऊद इब्राहिम उपचारादरम्यान मरण पावला असून पाकिस्तान सरकारला हे लपवायचे आहे.
हेच कारण आहे की तेथे इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरावर बंदी आली असल्याचे मत काही लोकांच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये व्यक्त केले जात आहे. तथापि, अद्याप कोणत्याही सरकारी एजन्सी किंवा मीडियाने याला दुजोरा दिलेला नाही. चंदन शर्मा या युजरने दाऊद मारला गेला असल्याचा दावा केला आहे.
दाऊद इब्राहिम जिवंत असेल तर पाकिस्तानने पुरावे द्यावेत, असे एका युजरने म्हटले आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट बंद आहे, सोशल मीडिया नीट काम करत नाहीये, याचा अर्थ पाकिस्तानला काहीतरी मोठी गोष्ट लपवायची आहे, यामुळे कदाचित दाऊद उपचारादरम्यान मरण पावला असावा असे दावे सोशल मीडियामध्ये केले जात आहेत.
मात्र याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे पाकिस्तानात नेमके काय घडले आहे, दाऊद इब्राहिम सोबत काय झाले आहे ? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.