Most Dangerous Destinations : दरवर्षी अनेक पर्यटक जगातील विविध पर्यटन स्थळी भेट देत असतात. पण जगात अशी काही पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी कोणीही जायला सहजासहजी तयार होत नाहीत. कारण अशी काही ठिकाणे आहेत जी सर्वाधिक धोकादायक असतात.
आज तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. कारण ही अशी ठिकाणे आहेत ज्याला सर्वाधिक धोकादायक म्हणून ओळखले जाते. तसेच कोणीही या ठिकाणी जाण्याची हिम्मत करत नाही.
ही जगातील सर्वात धोकादायक ठिकाणे आहेत
माउंट वॉशिंग्टन
माउंट वॉशिंग्टन या ठिकाणी जगातील सर्वाधी जोरदार वारे या ठिकाणी वाहते. ताशी 327 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हे ठिकाण सर्वाधिक धोकादायक ठिकाणच्या यादीत येते. त्यामुळे येथे कुणीही जाण्याचा प्रयत्न करत नाही.
डेथ व्हॅली
डेथ व्हॅली दे देखील अमेरिकन खंडातील सर्वाधिक धोकादायक ठिकाण मानले जाते. या ठिकाणचे तापमान १३४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. त्यामुळे याठिकाणी जाण्याची कोणीही हिम्मत करत नाही.
दानाकिल वाळवंट
अनेकदा वाळवंटाचे नाव ऐकले की सर्वांना उष्णता आणि बारीक वाळूचे ढीग आठवतात. मात्र ईशान्य इथिओपियातील डनाकिल वाळवंट हे सर्वात धोकायदाक मानले जाते. या वाळवंटामध्ये ज्वालामुखी सक्रिय आहे. या ठिकाणी जाणे म्हणजे मुत्यू ला हाक मारण्यासारखे आहे.
मादीदी राष्ट्रीय उद्यान
ऍमेझॉन नदीवर स्थित मादिदी नॅशनल पार्क हे सर्वात विषारी आणि आक्रमक प्राण्यांचे घर मानले जाते. या ठिकाणी जाण्यास लोक घाबरतात. इथे कोणी गेला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. कारण कीटक चावला तर कोणीही या ठिकाणाहून बाहेर पडू शकत नाही.
सिनाबुंग इंडोनेशिया
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील सिनाबुंग हे असे ठिकाण आहे जिथे सतत जळणारा ज्वालामुखी आहे. येथे सतत स्फोट होत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणी जात नाही. अनेक वर्षांपूर्वी लाखो लोकांनी येथून स्थलांतर केले आहे.