भारत

PPF Withdrawal : पीपीएफ योजनेतून पैसे कधी आणि कसे काढू शकता? घरबसल्या या ऑनलाईन पद्धतीने काढा पैसे

PPF Withdrawal : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे कधी आणि कसे काढू शकता याबद्दल आज तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. या योजनेत पैसे गुंतवणे फायदेशीर ठरत आहे.

PPF गुंतवणूकदारांना १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. एका वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवण्याची मुभा मिळते. या गुंतवलेल्या पैशावर सरकारकडून 7.1 टक्के वार्षिक व्याज दिले जाते.

१५ वर्षासाठी PPF धारक या योजनेत गुंवणूक करू शकतात. १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर PPF धारक या योजनेतून पैसे काढू शकतात. मात्र जर तुम्हाला त्याअगोदर पैसे काढायचे असतील तरीही तुम्ही पैसे काढू शकता.

5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकता.

तुमचे ज्या तारखेला PPF खाते उघडले आहे त्या तारखेपासून ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार PF चे पैसे काढू शकता. या पैशावर सरकारकडून तुम्हाला वार्षिक ७.१ टक्के व्याज दिले जाईल.

वैद्यकीय उपचारांसाठी

एखादी व्यक्ती स्वत:साठी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकते. काढता येणारी कमाल रक्कम ही चौथ्या वर्षाच्या शेवटी शिल्लक रकमेच्या 50% किंवा मागील वर्षाच्या शेवटी शिल्लक – यापैकी जे कमी असेल.

शिक्षणाच्या खर्चासाठी

PPF खातेधारक मुलांच्या किंवा स्वतःच्या शिक्षणासाठी गुंतवलेले पैसे काढू शकतात. काढता येणारी कमाल रक्कम ही चौथ्या वर्षाच्या शेवटी शिल्लक रकमेच्या 50% किंवा मागील वर्षाच्या शेवटी शिल्लक – यापैकी जे कमी असेल.

गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास

जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनी खात्यातून पैसे काढू शकतात. नॉमिनी हा त्या खात्यातील पूर्ण रक्कम काढण्यास पात्र असतो.

तुमची PPF रक्कम ऑनलाइन कशी काढायची?

तुम्ही खाते उघडलेल्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर तुमच्या पीपीएफ खात्यात लॉग इन करा.

एकदा लॉग इन केल्यानंतर, “पैसे काढणे” किंवा “आंशिक पैसे काढणे” विभागात जा आणि तुम्हाला काढायची असलेली रक्कम निवडा.

खाते क्रमांक आणि IFSC कोडसह तुमचे बँक खाते तपशील प्रविष्ट करा ज्यामध्ये तुम्हाला काढलेली रक्कम जमा करायची आहे.

पैसे काढण्याची विनंती सबमिट करा आणि पुष्टीकरणाची प्रतीक्षा करा.

पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts