Nithyananda : गेल्या काही दिवसांपासून नित्यानंद खूपच चर्चेत आले आहेत. पण हाच नित्यानंद २०१९ मध्ये भारतातून पळून गेला आहे. नित्यानंद याच्यावर भारतात बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने भारतातून पलायन केले आणि दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक झाला.
भारतातून पळून गेल्यानंतर नित्यानंद याने एक जमीन विकत घेतली आणि तिथे त्याने आपला एक वेगळा देश म्हणून त्या जागेला घोषित केले आणि त्याचे नाव कैलासा ठेवण्यात आले. आता त्याच्या याच प्रकरणाची खूप चर्चा सुरु आहे.
कोण आहे नित्यानंद?
नित्यानंद याचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी तामिळनाडूमध्ये झाला आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. 1992 नित्यानंद याने शालेय शिक्षण पूर्ण केले.
नित्यानंद याने १९९५ मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. पण असे सांगितले जात आहे की त्याने १२ व्या वर्षापासूनच रामकृष्ण मठात शिक्षा घेण्यास सुरुवात केली होती. 1 जानेवारी 2003 रोजी नित्यानंद यांनी बंगळुरूजवळील बिदादी येथे पहिले आश्रम उघडले.
यानंतर नित्यानंद याने अनेक आश्रम उघडली. २०१० मध्ये नित्यानंद याच्यावर फसवणूक आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला. एक सेक्स सीडी समोर आल्यानंतर नित्यानंद याला अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसातच त्याला जमीन देखील मिळाला.
यानंतर २०१२ मध्ये नित्यानंद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. नोव्हेंबर 2019 मध्ये पुन्हा त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करून त्यांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर त्याने देशातून पलायन केले.
सध्या नित्यानंद याने स्वतःचा देश तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांची सभा आहे. त्यामध्ये विजयप्रिया नित्यानंद नावाच्या महिलेनेही या बैठकीत आपले म्हणणे मांडले.
विजयप्रिया नित्यानंद स्वतःला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ चे प्रतिनिधी म्हणून वर्णन करतात. तिचा दावा आहे की ती युनायटेड नेशन्समधील कैलासाची युनायटेड स्टेट्सची कायमस्वरूपी राजदूत आहे.
विजयप्रिया नित्यानंद या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा हा हिंदूंचा पहिला सार्वभौम देश आहे, ज्याची स्थापना नित्यानंदांनी केली आहे. विजयप्रिया यांनी नित्यानंद यांचे हिंदूंचे ‘सर्वोच्च गुरु’ म्हणून वर्णन केले आणि त्यांचा ‘छळ’ होत असल्याचा आरोप केला.
नित्यानंद याने स्वतः घोषित केलेल्या कैलास देशाबद्दल अनेक दावे केले आहेत. ते दावे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
दावा १
भारतातून पळून गेल्यानंतर, नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये जमीन खरेदी केली आणि तो आपला देश म्हणून घोषित केला. त्याला ‘कैलास’ असे नाव देण्यात आले. भारतापासून त्याचे अंतर सुमारे 17 हजार किलोमीटर आहे.
दावा २
कैलासाच्या वेबसाइटचा दावा आहे की, कैलासा चळवळ अमेरिकेत सुरू झाली. त्याची स्थापना नित्यानंद यांनी केली होती. संयुक्त राष्ट्रांमध्ये हा हिंदूंचा एकमेव आणि पहिला सार्वभौम देश आहे असा दावा विजयप्रिया नित्यानंद यांनी केला आहे.
दावा ३
लोकसंख्येबाबत, कैलासाच्या वेबसाइटवर असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू धर्म मानणारे 200 कोटी लोक त्यांच्या देशाचे नागरिक आहेत. त्यापैकी १ कोटी आदि शंकराला मानणारे आहेत. विजयप्रिया नित्यानंद यांनी संयुक्त राष्ट्रात दावा केला की कैलासामध्ये 20 लाख स्थलांतरित हिंदू राहतात.
दावा ४
अलीकडे 13 जानेवारी रोजी कैलासाने अमेरिकेसोबत द्विपक्षीय करार झाल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने कैलासाला मान्यता दिल्याचा दावाही केला जात आहे. विजयप्रिया नित्यानंद यांनी दावा केला होता की, कैलासाने 150 देशांमध्ये दूतावास आणि एनजीओ स्थापन केल्या आहेत.
दावा ५
कैलासा देखील स्वतःचे संविधान असल्याचा दावा करतो. येथे धर्मग्रंथ आणि मनुस्मृतीवर आधारित कायदा चालतो, असा दावा केला जातो. येथील लोक मनूचे नियम पाळतात. कैलासाचे सरकार हे सर्वात महत्वाचे आणि अधिकृत धर्मशास्त्र (हिंदू कायद्याचे पुस्तक) मानते. वेबसाईटनुसार, प्राचीन भारतात या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ दीड हजार वर्षांपूर्वी नियमांचे पालन केले जात होते.
दावा ६
कैलासाच्या वेबसाईटचा दावा आहे की या देशात अत्याचारित हिंदूंना संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात.
दावा ७
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, कैलासमध्ये इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘नंदी’ आहे. देशाचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आणि राष्ट्रीय वृक्ष ‘वट’ आहे.
दावा ८
कैलासाने स्वतःची रिझर्व्ह बँक असल्याचा दावाही केला आहे. त्याचे स्वतःचे चलन देखील आहे. रिझर्व्ह बँक आणि चलन ऑगस्ट 2020 मध्ये लाँच करण्यात आले.