भारत

School Buses In Yellow Color : जगातील सर्व शाळेच्या बसचा रंग पिवळा का आहे? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

School Buses In Yellow Color : रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा शाळेच्या बस पाहिल्या असतील. बस कधीच तुम्हाला रंगीबेरंगी रंगामध्ये दिसणार नाहीत. बसचा रंग हा पिवळाच असतो. जगातील शाळेच्या बसचा रंग हा पिवळाच आहे. बसला हा रंग असण्यामागे एक कारण आहे.

शाळेच्या सर्व बस पिवळ्या रंगाच्या असाव्यात. यामागेही एक कारण आहे. त्यामुळे बसचा रंग दुसरा कोणताही नसतो. सर्वात प्रथम शाळेच्या बसचा पिवळ्या रंगाचा प्रवास कुठे आणि कधी सुरु झाला हे जाणून घेऊया.

शाळेच्या बसचा रंग फक्त पिवळा का असतो?

How Stuff Works या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतून शाळेच्या पिवळ्या रंगाच्या बस सुरु झाल्या. कोलंबिया विद्यापीठात शिकवणाऱ्या शिक्षकांनी मिळून 1930 मध्ये हा निर्णय घेतला. विद्यापीठाचे प्राध्यापक फ्रँक सायर यांनी याबाबत संशोधन सुरू केले.

फ्रँक सायर यांनी शालेय वाहतुकीशी संबंधित संशोधनात त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी शालेय वाहनांसाठी कोणतेही नियम आणि कायदे नव्हते, त्यानंतर शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक बैठक बोलावण्यात आली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला की सर्व बसचा रंग काय असणार.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात संशोधन करण्यात आले

अमेरिकेतून बस बनवणारे उच्चशिक्षित शिक्षक, परिवहन अधिकारी आणि अभियंते बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीमध्ये बसचा रंग कसा असावा याबाबत चर्चा झाली. भिंतीवर अनेक रंग लावण्यात आले मात्र पिवळा आणि केसरी रंग अधिक निवडण्यात आला. बैठकीमध्ये सर्वांनी पिवळा रंग निवडला.

शास्त्रीय कारण

हा रंग निवडण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. हा रंग डोळ्यांना सहजपणे दिसतो. तसेच हा पिवळा रंग दृश्यमानता स्पेक्ट्रमच्या शीर्षस्थानी राहतो. याचे कारण असे की डोळ्यांमध्ये एक पेशी असते ज्याला फोटोरिसेप्टर म्हणतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts