भारत

Train Cross Sign : रेल्वेच्या पाठीमागच्या बाजूला X चिन्ह का असते? जाणून घ्या यामागील रंजक कारण

Train Cross Sign : भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. तसेच तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने प्रवास करत असताना तुम्ही अनेकदा रेल्वे डब्यांवर अनेक वेगवेगळी चिन्हे पाहिली असतील. या प्रत्येक चिन्हाचा अर्थ हा वेगवेगळा असतो.

अनेकदा तुम्ही रेल्वेचे डबे संपल्यानंतर शेवटच्या डब्यावर X हे चिन्ह पहिले असेल. पण तुम्ही कधी या चिन्हाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही तर आज तुम्हाला या चिन्हाबद्दल सांगणार आहोत.

X हे चिन्ह रेल्वेचा हा शेवटचा डबा आहे असे दर्शवते. हे चिन्ह पाहून रेल्वे स्टेशन वरील अधिकारी असे समजतात की रेल्वेने स्टेशन पास केले आहे. या चिन्हामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना सहजपणे समजते की रेल्वेने स्टेशन क्रॉस केले आहे. यातील एकही डबा कुठेही गेला नाही हे यावरून लगेच समजते.

रात्री X कसे दिसेल

सकाळी ‘X’ हे अक्षर सहजपणे डोळ्यांना दिसते मात्र रात्रीच्या वेळी हे चिन्ह सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एक एलईडी लाईट असते जी स्टेट लुलूक करत असते त्यावरून अधिकाऱ्यांना रेल्वे पास झाल्याचे समजते तसेच सर्व डबे सुरक्षित आहेत हे देखील समजते.

शेवटच्या चौकटीवर X चिन्ह काढले नाही तर?

जर ट्रेनच्या शेवटच्या डब्यात X चिन्ह नसेल तर ही ट्रेनसाठी आपत्कालीन परिस्थिती आहे. यामुळे ट्रेनचे काही डबे वेगळे झाल्याची शक्यता वर्तवली जाते. वरील परिस्थितीत, अपघात झाल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि त्वरीत कारवाई करण्यास मदत होते.

जर शेवटच्या डब्यावर X हे चिन्ह दिसले नाही तर ते वेगळे झालेले डबे शोधण्यासाठी अधिकारी सक्षम होतात आणि आत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्वरित कारवाई करू शकतात.

एक्स का?

भारतीय रेल्वे गाड्यांमागे X हे अक्षर का निवडले गेले असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर त्याचे सोपे उत्तर आहे की X निवडण्याचे कोणतेही विशिष्ट कारण नाही. हे फक्त एक क्रॉस-चिन्ह आहे. ‘X’ चिन्ह इतर इंग्रजी अक्षरांपेक्षा जास्त अंतरावरून दिसू शकते. म्हणूनच X हे चिन्ह इतर कोणत्याही चिन्हापेक्षा चांगले चिन्ह आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts