Gestational Diabetes : गरोदरपणात मधुमेह असणाऱ्या महिलांनी कधीही करू नका या चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

Gestational Diabetes : महिलांची जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. महिलांना खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलाव्या लागतात. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला कोणताही धोका होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी गरोदर महिलेवर असते.

मात्र अनेक महिलांना गरोदरपणात मधुमेह असतो आणि काही वेळा तो घातकही ठरत असतो. तसेच गरोदरपणात महिलांची साखरेची पातळी देखील वाढत असते. त्यामुळे त्यांना खूप काळजीपूर्वक आहार घ्यावा लागतो.

मधुमेहामुळे शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे बीपी वाढते. हार्मोन्सचे उत्पादन असंतुलित होते. जन्माला येणाऱ्या मुलाला देखील यामुळे धोका निमार्ण होऊ शकतो.

त्यामुळे महिलांनी गरोदरपणात साखरेची पातळी वाढू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. तसेच काही चुका महिला यावेळी करत असतात त्यादेखील करणे त्यांनी टाळले पाहिजे.

महिला खालील चुका करतात

१. साखरेची पातळी न तपासणे

अनेकवेळा महिला गरोदर असताना काही चाचण्या करत नाहीत. त्यामुळे बाळाचे आरोग्य आणि त्या गरोदर महिलेचे आरोग्य कसे आहे समजत नाही. महिलांची ही चूक खूप धोकादायक ठरू शकते.

महिलांनी गरोदरपणात साखरेची पातळी तपासणी गरजेचे असते. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्वाचे ठरते. डॉक्टरांच्या सल्ल्याने साखरेची पातळी कमी देखील ठेवली जाऊ शकते.

२. चुकीचा आहार घेणे

गरोदरपणात अनेक महिला चुकीचा आहार घेतात. त्यामुळे बाळाला पोषक तत्वे भेटत नाहीत. त्यामुळे बाळाचे आरोग्य सुधारत नाही. महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घेणे फायद्याचे ठरू शकते.

आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. 3 जेवणाऐवजी 5 लहान जेवण खा. आपल्या आहारात तेलकट अन्न, फास्ट फूड, पॅकबंद अन्न, जंक फूड यांचा समावेश करू नका. अधिकाधिक घरगुती ताजे अन्न योग्य प्रकारे खा.

३. गरोदरपणात व्यायाम न करणे

गरोदरपणात महिला अगदी निवांत असतात. त्यामुळे त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढते. महिलांनी यावेळी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे असते. योगा, चालणे, स्ट्रेचिंग, खोल श्वासोच्छ्वास यासारखे सोपे व्यायाम करू शकत असले तरी गर्भधारणेमध्ये तीव्र व्यायाम टाळले पाहिजेत.

४. वजन नियंत्रित न ठेवणे

अनेकवेळा महिला गरोदर असल्याने जास्त हालचाल करत नाहीत. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. तसेच आहारामध्ये बदल झाल्यामुळे देखील वजन वाढते. वाढते वजन तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.

वजन वाढल्याने मधुमेहाचा त्रास देखील वाढू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवावे. गर्भधारणेदरम्यान डॉक्टर आहार घेण्याची शिफारस करत नाहीत. गर्भधारणेदरम्यान अधूनमधून उपवास करणे हा देखील चांगला पर्याय नाही. पण साधा आहार घ्या आणि वेळेवर अन्न खा आणि रोज हलका व्यायाम करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe