भारत

Yamaha RX100 : Yamaha RX100 प्रेमींनो बजेट तयार ठेवा! लोकप्रिय बाईक नवीन अवतारात होणार लॉन्च, इतकी असणार किंमत…

Yamaha RX100 : ९० च्या दशकात ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी Yamaha RX100 आता पुन्हा एकदा मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी येत आहे. कंपनीकडून लवकरच Yamaha RX100 नवीन अवतारात लॉन्च केली जाणार आहे.

या बाईकमध्ये नवीन इंजिन आणि वेगळे लूक देण्यात येणार आहेत. ९० च्या दशकात बुलेटपेक्षाही RX 100 ची क्रेझ अधिक होती. राज्य करण्यासाठी ही बाईक पुन्हा एकदा कंपनीकडून लॉन्च करण्यात येत आहे.

Yamaha RX100 चा लुक

नवीन Yamaha RX100 चा लुक कंपनीकडून बदल्यांना आला आहे. पिकअप आणि रेट्रो डिझाइनमुळे ही बाईक तरुणांमध्ये फेमस आहे. अनेक अभिनेत्यांसोबत ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली होती.

1996 मध्ये कठोर उत्सर्जन नियमांमुळे कंपनीला या बाईकचे उत्पादन थांबवावे लागले. मात्र या बाईकची क्रेझ आजही मोठ्या प्रमाणात आहे. आजही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या बाईक दिसत असतात.

बाईक अपडेट होणार

नवीन Yamaha RX100 मोठ्या आणि अधिक शक्तिशाली इंधन-इंजेक्‍ट पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल, कंपनी बाईकमध्ये ग्राहकांसाठी लहान इंजिनसह देऊ शकते. LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), इलेक्ट्रिक स्टार्ट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी नवीन वैशिष्ट्ये देखील बाइकमध्ये आढळू शकतात.

Yamaha RX100 मध्ये नवीन वैशिष्ट्ये

कंपनीकडून अनेक बदल RX100 मध्ये करण्यात आले आहेत. या गाडीमध्ये नवीन सस्पेंशन सिस्टम देण्यात आली आहे. बाइकला वायर-स्पोक व्हील, टेलिस्कोपिक फॉर्क्सचे बनलेले फ्रंट सस्पेन्शन आणि ड्युअल शॉक शोषक असलेले मागील सस्पेन्शन मिळेल.

बाइकला फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. कोणते इंजिन दिले जाऊ शकते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामाहाकडे सध्या 125 cc, 150 cc आणि 250 cc इंजिन आहेत, यापैकी कोणतेही इंजिन वापरले जाणे अपेक्षित आहे. 125 सीसी इंजिन किंवा 150 सीसी इंजिन वापरले जाण्याची दाट शक्यता आहे.

किंमत

कंपनीकडून RX100 बाईक भारतामध्ये 2023 च्या शेवटी किंवा २०२४ च्या सुरुवातीस लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन RX100 बाइकची किंमत अंदाजे रु. 1.25 लाख ते रु. 1.5 लाख असू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Yamaha RX100

Recent Posts