भारत

पावसाळ्यामध्ये मस्तपैकी रेल्वेने फिरता येतील भारतातील ‘ही’ पर्यटनस्थळे; टळेल प्रवासातील धोका आणि घ्याल मनमुराद निसर्गाचा आनंद

बऱ्याचदा कित्येक जण पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचे आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी प्लॅनिंग करतात व कित्येकदा ही प्लॅनिंग मित्रांसोबत जास्त करून केली जाते. कधी कधी कुटुंबासोबत देखील अशा ट्रीप प्लान केल्या जातात.]

परंतु बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी घाटमाथ्यात धुके किंवा अतिशय जोराचा पाऊस असल्यामुळे हा प्रवास धोक्याचा देखील होऊ शकतो व कधीकधी जीवावर बेतू शकते.

त्याऐवजी तुम्ही जर पावसाळ्यामध्ये फिरण्याचा प्लॅन आखत असाल तर तो रेल्वेने फिरता येईल अशा पद्धतीने आखणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना रेल्वेने प्रवास करणे आवडते व पावसाळ्यामध्ये रेल्वेचा प्रवास हा मनात साठवून राहतील अशा आठवणी देऊन जातो. त्यामुळे आपण या लेखामध्ये तुम्हाला पावसाळ्यामध्ये रेल्वेने देखील जाता येईल अशा पर्यटन स्थळांची माहिती बघू.

 पावसाळ्यात रेल्वेने फिरून पाहता येतील भारतातील ही पर्यटन स्थळे

1- गोवा गोवा म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात ते त्या ठिकाणी असलेले सुंदर समुद्रकिनारे व सुंदर समुद्रकिनारांनी नटलेला गोवा पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतो. पावसाळ्यामध्ये गोव्याचे समुद्रकिनारे खूपच सुंदर दिसायला लागतात व निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर गोवा हे एक भारतातील उत्तम ठिकाण आहे.

तसेच मांडवी नदीवर असलेला दूधसागर धबधबा हा गोव्यामध्ये पाहण्यासारखा असून पणजी शहरापासून तो साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर आहे. पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये हा धबधबा आहे. तुम्हाला जर गोवा फिरायला गेलात आणि हा धबधबा जर पाहायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणाहून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कॅसलरॉक आहे. या स्टेशन पर्यंत तुम्ही रस्त्याने जाऊ शकतात.

2- कोडाईकनाल हे एक प्रसिद्ध असे हिल स्टेशन असून तामिळनाडू राज्यांमध्ये स्थित आहे. कोडाईकनालला प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन म्हणजेच हिल स्टेशनची राणी म्हणून संबोधले जाते. पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी हे एक उत्तम असे ठिकाण असून या ठिकाणी असलेले सुंदर धबधबे आणि तलाव व मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पसरलेली हिरवाई मनाला आकर्षण घेते.

पावसाळ्यामध्ये येथे ढगांची मस्ती आपल्याला पाहायला मिळते व सतत ढग इकडून तिकडे फिरताना आपल्याला दिसून येतात. तुम्हाला जर कोडाईकनालला ट्रेनने जायचे असेल तर पालानी स्टेशनला उतरून तुम्ही कोडाईकनालला जाऊ शकतात. याशिवाय विमानाने जायचे असेल तर मदुराई किंवा कोइंबतूर यापैकी कोणत्याही विमानतळावर उतरून तुम्हाला गाडीने कोडाईकनालला जाता येते.

3- माथेरान देशातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख असून या ठिकाणी असलेली टॉय ट्रेन ही जगात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक इको पॉईंट असून सुंदर असे डोंगरकडे तसेच टेकड्या  आणि धबधबे यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मन आकर्षित होत असते व निवांत अशी शांतता अनुभवायला मिळते.

माथेरानला अनेक सुंदर ठिकाणे असून त्या ठिकाणच्या थंडगार वातावरण तसेच पावसाळ्यामध्ये धुक्याची पसरलेली चादर आणि पावसाळ्यात असलेले अल्हाददायक  वातावरण तुमचा तणाव कमी करण्यास मदत करतो.

4- कुर्ग या ठिकाणाला भारताचे स्कॉटलंड म्हटले जाते व याचे प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी धुक्यात असलेल्या टेकड्या आणि दऱ्या स्कॉटिश हायलँड्स प्रमाणे आहेत. या ठिकाणी तुम्हाला म्हैसूर, हसन तसेच मंगलोर या तीनही रेल्वे स्टेशन वरून जाता येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts