YouTuber Harsh Rajput : तुम्ही देखील यूट्यूबवर एका पत्रकाराला मास्क न लावण्याने किंवा इतर करणारे नागरिकांना मारहाण करताना पहिला असेल तर कधी हा पत्रकार शाळेत जाऊन शिक्षकांना उघडे पाडतो. या प्रकारचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून हा पत्रकार नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करतो .
आम्ही तुम्हाला सांगतो या पत्रकाराचे नाव हर्ष राजपूत असून ते आपल्या यूट्यूबवर असणाऱ्या ‘धाकड न्यूज’ नावाचे चॅनेलसाठी एका पत्रकाराचा रोल प्ले करतो. यामुळे तो नेहमी सोशल मीडियावर चर्चेत देखील असतो मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.
सध्या हर्षचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिहारमधील रहिवासी असलेल्या हर्ष राजपूतने लाखोंची ऑडी कार खरेदी केली आहे आणि तीही त्याच्या चॅनलच्या कमाईतून. या कारची किंमत जवळपास 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर ऑडी कार खरेदी केल्यानंतर हर्षने ती आपल्या घरातील तबेल्यात गायींच्या शेजारी उभी केली. येथून त्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हर्ष यूट्यूबवर खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या चॅनलचे 33 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. हा फोटो गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील असला तरी सध्या तो व्हायरल होत आहे.
Aaj Tak च्या वृत्तानुसार, कोरोना लॉकडाऊन दरम्यान अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या जमान्यात अनेकांनी छोटे-छोटे व्हिडिओ आणि सोशल मीडियाला रोजगाराचा आधार दिला. बिहारच्या औरंगाबाद येथील जसोया येथील रहिवासी असलेल्या हर्षचाही त्यात समावेश होता. हर्षने त्याच्या व्हिडिओंद्वारे मान आणि पैसाही मिळवला आहे.
मात्र, तो त्याच्या व्हिडिओमध्ये शिवीगाळही करतो. या व्हायरल फोटोवर बाकीचे लोक हर्षच्या मेहनतीचे कौतुक करत आहेत. तुम्ही कितीही गरीब कुटुंबात जन्माला आलात तरी मेहनतीने परिस्थिती बदलू शकते, असे ते सांगत आहेत. एकाने लिहिले की तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी नेहमी तुमच्या मुळाशी जोडलेले रहा. या फोटोवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
हे पण वाचा :- Post Office Scheme: होणार बंपर कमाई ! ‘ही’ योजना करणार फक्त 120 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट; जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक