BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये सध्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. जर तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकता. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, इच्छुकांनी संबंधित पत्त्यावर देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “क्ष-किरण सहाय्यक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या उमेदवारांचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता
या जागांसाठी 12 वी पास उमेदवारांना संधी दिली जाईल, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
वयोमर्यादा
या पदांसाठी वयोमर्यादा 33 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पद्धती
या जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई-400015. या पत्त्यावर 28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार https://www.mcgm.gov.in/ ला भेट देऊ शकतो.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तसेच अर्ज 28 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत.