7th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीसोबत अनेक प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात व या सगळ्या सोयी सुविधा देत असताना त्या सातवा वेतन आयोगातील ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार दिल्या जातात. तसेच आता ज्या काही कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यापासून ते इतरसोयी सुविधा मिळत आहेत ते सगळ्या सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत.
सध्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ लवकरच होईल अशी एक अपेक्षा असून जर असे झाले तर महागाई भत्ता 46% होईल. महागाई भत्ता बाबतची घोषणा अद्याप देखील करण्यात आलेली नाही परंतु केंद्र सरकारचे सातवा वेतन आयोगाच्या अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांच्याकरिता व संरक्षण मंत्रालयातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या करता एक खूप महत्त्वपूर्ण आणि फायद्याचे अपडेट सध्या समोर आले असून त्या विषयाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नोकरीत प्रमोशन
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सातव्या वेतन आयोग अंतर्गत असलेले कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे अपडेट असून या कर्मचाऱ्यांना आता नोकरीमध्ये बढती देण्यात येणार आहे व याबाबतची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली असून यानुसार संरक्षण नागरिक कर्मचाऱ्यांकरिता हे प्रमोशन जाहीर करण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्यामध्ये असलेल्या सर्विस कालावधीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या बढती करिता कर्मचाऱ्यांकरिता काही पात्रतेचे निकष ठरवण्यात आले असून जे कर्मचारी ते निकष पूर्ण करतील त्यांनाच हे प्रमोशन मिळणार आहे.
या अटी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना मिळेल प्रमोशन?
कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे व यामध्ये नोकरीमध्ये बढती अर्थात प्रमोशन करिता कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे स्तरांकरिता वेगवेगळ्या कामाचा अनुभव निश्चित करण्यात आला असून यानुसारच प्रमोशन हे ठरवण्यात येणार आहे.
यामध्ये जर विचार केला तर स्तर एक म्हणजेच लेवल एक ते दोन करिता तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार असून लेवल एक ते तीन करिता तीन वर्षाचा आणि लेव्हल दोन ते चार करिता तीन ते आठ वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. लेवल सात पर्यंतच्या कर्मचाऱ्यांंकरिता एक ते बारा वर्षाचा अनुभव आवश्यक असणारा असून हे निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रमोशनचा लाभ हा मिळणार आहे.
तसेच प्रत्येक लेवलकरिता प्रमोशन करिता असलेले निकष हे वेगवेगळे असून ग्रेडनुसार यासाठीची आवश्यक यादी तयार करण्यात आली असून ती शेअर देखील करण्यात आलेली आहे. याच यादीच्या आधारावर कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात येणार आहे. संबंधीचे जे नवीन अपडेट आहेत ते ताबडतोब लागू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
यामध्ये जे कर्मचारी पात्र ठरत असतील त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार वेळ न करता ताबडतोब प्रमोशन दिले जाणार आहे. परंतु हे जे काही प्रमोशन अर्थात बढती मिळणार आहे ते नेमकी कोणत्या पदांना मिळणार आहे हे मात्र संबंधित मंत्रालयाकडून अद्याप पर्यंत स्पष्ट करण्यात आलेले नाही.