जॉब्स

Adivasi Vikas Vibhag : आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Adivasi Vikas Vibhag : बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या भरतीच्या प्रक्रियेला वेग आला असून, वेगवगेळ्या ठिकाणी आता भरती सुरु आहे. अशातच आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सध्या भरती सुरु झाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत एकूण 182 जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत “उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 182 जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही नाशिक येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

राखीव प्रवर्गासाठी (SC/ST/PWD) 900/- रुपये तर इतर सर्वांसाठी 1000/- रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://tribal.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. त्यासाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
-ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज अपूर्ण मानला जाईल.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
-देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts