ECHS Ahmednagar Bharti 2024 : पदवीधर उमेदवार असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे, माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) अहमदनगर येथे सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत.
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) अहमदनगर येथे “OIC, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, लॅब सहाय्यक, फार्मासिस्ट, नर्स सहाय्यक, दंत आरोग्य/सहाय्यक, चालक, दक्षता ऑपरेटर (चौकीदार)” पदाची 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 असून, शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवगेळी असेल, ही भरती अहमदनगर येथे होत असून, उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत, यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
या भरतीसाठी उमेवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीसाठी स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड येथे 22 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट echs.gov.in ला भेट देऊ शकता.
असा करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.