जॉब्स

Bank of Baroda Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ बडोदामध्ये मिळणार नोकरीची संधी, मुंबईत सुरु आहे भरती !

Bank of Baroda Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी उत्तम आहे, सध्या मुंबईतील बँक ऑफ बडोदा या शाखेत भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आजच आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत.

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “व्यवस्थापक – सुरक्षा” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर तुम्हाला अर्ज सादर करता येणार नाही. यापूर्वीच आपले अर्ज पाठवा.

वरील पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा देखील आहे, येथे – 25 ते 35 वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, येथे अर्ज शुल्क देखील अनिवार्य आहे, सामान्य उमेदवारांसाठी 600/- रुपये शुल्क असतील, तर SC, ST आणि महिलांसाठी 100/- रुपये इतके शुल्क असतील.

वरील पदांसाठी अर्ज https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECT_SD2023/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. हे अर्ज 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.bankofbaroda.in/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-ऑनलाईन अर्ज 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts