Bank of Baroda Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधताय, तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मुंबईत अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरपोस्टाने पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या ठिकाणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासावी. अर्ज, बँक ऑफ बडोदा, प्रादेशिक कार्यालय, शाहजहानपूर प्रदेश, एनटीआय कॅम्पस जवळ, लोधीपूर रोड, शाहजहानपूर, जिल्हा शाहजहांपूर, उत्तर प्रदेश – 242001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
लक्षात घ्या अर्ज वर दिलेल्या तारखे अगोदर पाठवायचे आहेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.bankofbaroda.in/ ला भेट द्या.
अशा प्रकारे करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर पाठवायचे आहेत.
-अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.