Bhagini Nivedita Sahakari Bank : सध्या तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल आणि पुण्यात रहिवासी असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत “मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत 03 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 40 ते 55 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज hr@bhagininiveditabank.com या मेलवर सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bhagininiveditabank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज hr@bhagininiveditabank.com या ई-मेल सादर करायचा आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.