जॉब्स

SSC CHSL 2022 : मोठी संधी! 5 नोव्हेंबरपासून SSC CHSL भरतीसाठी करा अर्ज, जाणून घ्या रिक्त जागा

SSC CHSL 2022 : कोरोना काळापासून नोकरी मिळवणे हे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे योग्य वेळी आलेली संधी तुम्ही सोडू नका. कारण कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा 2022 साठी ऑनलाइन अर्ज 5 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आयोगाने 6 जुलै रोजी जारी केलेल्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार, उमेदवारांकडून 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज घेतले जातील आणि संगणक-आधारित टियर वन परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे.

एसएससीने अद्याप पदांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र तज्ज्ञांवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये चार हजारांहून अधिक पदांची भरती होण्याची शक्यता आहे. CHSL 2021 मध्ये 54 मंत्रालये आणि विभागांमध्ये 6072 पदे आहेत.

CHSL भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी पास असणे आवश्यक आहे. DEO CAG पदांवर रिक्त जागा आल्यास त्यासाठी 12वी विज्ञान शाखेची मागणी केली जाते. तसेच बारावीच्या वर्गात गणित हा एक विषय म्हणून अभ्यासला पाहिजे.

अर्जदारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असावी.

MTS अर्ज 25 जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे

SSC मधून मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज 25 जानेवारीपासून शक्य आहे. उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळेल आणि पहिल्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल किंवा मे मध्ये होण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts