BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले सादर करावेत. भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेणयासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
येथे अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून L. L. B. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि बार कौन्सिलचे सनद असणे आवश्यक आहे. ही भरती मुंबईत होत असून, उमेदवारांनी कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.
या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. या संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज :-
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.