जॉब्स

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत होणार १८४६ रिक्त पदांसाठी भरती! 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी, वाचा माहिती

BMC Recruitment 2024:- सुशिक्षित बेरोजगार आणि उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस खूप गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या काही उपलब्ध झालेल्या नोकरांच्या जाहिराती निघतात त्यामध्ये लाखोच्या संख्येत अर्ज दाखल केले जातात.

सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर असे कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हे अनेक विभागाच्या परीक्षांची तयारी करत असतात. यामध्ये तुम्ही देखील जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने तब्बल १८४६ कार्यकारी सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत होणार कार्यकारी सहाय्यक पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदाच्या एकूण 1846 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून याकरिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यकारी सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून याकरिता उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

प्रवर्गनिहाय रिक्त जागांची संख्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सामान्य श्रेणी म्हणजे सामान्य प्रवर्गाकरिता एकूण 506 रिक्त पदे, इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी एकूण रिक्त पदे 452, इडब्ल्यूएस एकूण रिक्त पदे 185, एससी एकूण रिक्त पदे 142, एसटी एकूण रिक्त पदे दीडशे, एसईबीसी एकूण रिक्त पदे 185, विशेष वर्ग एकूण रिक्त पदे 46
अशा पद्धतीने एकूण रिक्त पदे 1846 इतके आहेत.

साधारणपणे या भरतीसाठी कोणाला अर्ज करता येईल?
या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील असे उमेदवार अठरा ते पंचवीस वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहेच व त्यासोबतच मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. इतकेच नाहीतर 45% गुण असलेले पदवीधर देखील या पदांसाठी अर्ज करू शकता व त्यासोबतच कम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

काय हे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी चे उमेदवार इच्छुक व पात्र असतील असे उमेदवार 9 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत व ही शेवटची तारीख आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts