CRPF Constable Recruitment : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सीआरपीएफमध्ये जनरल ड्युटीसाठी ग्रुप सी कॉन्स्टेबलची भरती केली जात आहे. ही भरती सुमारे 1.30 लाख पदांवर होत आहे, जे उमेदवार यासाठी इच्छुक आहेत त्यांनी rect.crpf.gov.in आणि sc.nic.in वर जाऊन संबंधित पोस्टसाठी अर्ज करावेत.
बऱ्याच दिवसांपासून आयोगाकडून 1.30 CRPF कॉन्स्टेबल भरतीची माहिती समोर येत होती. अशातच बरेच उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी ताबडतोब येथे अर्ज सादर करावेत.
माहितीनुसार, आयोग ऑगस्टमध्ये या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करू शकते. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असेल त्याबद्दल जाणून घेऊया.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले तरुण यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना विशेष सूट दिली जाईल.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 3 पे मॅट्रिक्सच्या आधारे वेतन दिले जाईल. या उमेदवारांना 21700 ते 69100 पर्यंत वेतन दिले जाईल.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी वर दिलेल्या वेबसाईटद्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करताना सर्व प्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
-त्यानंतर भरतीच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची वैयक्तिक माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
-लक्षात आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे.
-त्यानंतर अर्जाची फी बहर सबमिट करा.
-भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.