CRPF Recruitment News:- सध्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांतर्गत अनेक भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्यासोबतच अनेक नवीन भरतीच्या नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहेत. साधारणपणे कोरोना कालावधीत स्थगित करण्यात आलेल्या सर्व भरती प्रक्रिया आता कार्यान्वित करण्यात आले असल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून भरतीची वाट पाहत असलेल्या तरुण-तरुणी करिता आता विविध विभागांमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आल्याचे सध्या चित्र आहे.
या अनुषंगाने जर भारतीय संरक्षण दलामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल व त्या पद्धतीने जर तयारी करत असाल व तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स अर्थात सीआरपीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024 करिता अधिकृत अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे व या भरतीची माहिती या लेखात घेणार आहोत.
सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल भरती
सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नोकर भरती करण्यात येत असून यासंबंधीचे अधिकृत अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आलेली असून ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीकरता अर्ज करायचा असेल ते उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकणार आहेत.
सीआरपी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करता अर्ज करायचा असेल असे पात्र उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
सीआरपी कॉन्स्टेबल भरती 2024 करिता आवश्यक वयोमर्यादा
केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांचे वय किमान 18 ते कमाल 23 वर्षे असणे गरजेचे आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?
सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती मध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये यादरम्यान पगार मिळेल.
अर्ज करण्यासाठी किती लागेल फी?
याकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज फी भरणे गरजेचे असून अनारक्षित प्रवर्गातील तसेच इतर मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना शंभर रुपये शुल्क भरणे गरजेचे आहे तर महिला प्रवर्ग, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना मात्र अर्ज शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती करता अर्ज करायचा असेल ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर मात्र उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
अधिक माहिती करिता अधिकृत साइटवरील अधिसूचना पाहणे गरजेचे आहे.